म्हाडा मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार : जितेन्द्र आव्हाड - MHADA to Build Affordable Houses in Thane and Mumbai Say Jitendra Awhad | Politics Marathi News - Sarkarnama

म्हाडा मुंबई-ठाण्यात परवडणारी घरं उभारणार : जितेन्द्र आव्हाड

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

म्हाडा मुंबईतील मोकळ्या जागा खरेदी करुन त्याजागी परवडणाऱ्या दरात घरं उभारणार असल्याची माहिती  जितेंद्र आव्हाड यांनी दिली.  जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक मंत्री आपल्या पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार घेतात. जितेंद्र आव्हाडांनी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जनता दरबार घेतला. यावेळी ते बोलत होते.

मुंबई : ठाण्यात व मुंबईत परवडणाऱ्या दरातील घरे उभारणार असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.  मायानगरी मुंबईत आपल्या स्वत:चं हक्काचं घर असावं, असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्न करणार असल्याचं, आव्हाड यांनी म्हटले आहे.

म्हाडा मुंबईतील मोकळ्या जागा खरेदी करुन त्याजागी परवडणाऱ्या दरात घरं उभारणार असल्याची माहिती  जितेंद्र आव्हाड यांनी दिली.  जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अनेक मंत्री आपल्या पक्षाच्या कार्यालयात जनता दरबार घेतात. जितेंद्र आव्हाडांनी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात जनता दरबार घेतला. यावेळी ते बोलत होते.

पूर्व उपनगरातील टागोर आणि कन्नमवार नगर या भागात मोठ्या वसाहती उभ्या करण्याचा आपला मानस असून या संदर्भात आपण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच मुंबई उपनगरात रिकामे असलेले भूखंड ताब्यात घेतले जाणार असून 

मुंबईत जे रिक्त भूखंड आहेत, त्याबाबतचे वाद न्यायप्रविष्ठ आहेत. अशा वाद असलेल्या जमिनी ताब्यात घेऊन परवडणारी घरं बांधता येतील, असं आव्हाड म्हणाले. यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरातील घर/सदनिका उपलब्ध करुन देता येतील. म्हाडाने ३० ते ४०  वर्षापूर्वी कन्नमवार नगरसारख्या भागात म्हाडाच्या गांधीनगर, मोतीलाल नगर यासारख्या ५६ वसाहती उभ्या केल्या असल्याचं आव्हाड म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख