सुशांत सिंहची मैत्रिण म्हणते,..त्यांचे स्वतःचेच साम्राज्य होते..

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर त्यांच्या जवळचे नातेवाईक व मित्रपरिवार सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अशीच एक पोस्ट त्याची मैत्रिण रोहिणी अय्यर हीने लिहिले आहे. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
सुशांत सिंहची मैत्रिण म्हणते,..त्यांचे स्वतःचेच साम्राज्य होते..
Rohini-Iyerf.

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर त्यांच्या जवळचे नातेवाईक व मित्रपरिवार सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. अशीच एक पोस्ट त्याची मैत्रिण रोहिणी अय्यर हीने लिहिले आहे. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. 

रोहिणी अय्यर हीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की "सुशांत सिंह राजपूत याला कोणत्याही  गटात राहायला आवडत नव्हते.  त्याने अनेकांच्या गट-तटाला नाकारले होते. त्यांच्याजवळ स्वतःचेच साम्राज्य होते. त्याला शंभर कोटीच्या क्लबबाबत आकर्षण नव्हते. तसेच त्याला पुरस्कारांमध्येही इटरेस्ट नव्हता.  अनेकांच्या गटबाजीमुळे सुशांतला कोणत्याही गट आवडायचा नाही. तो स्वतः योद्धा होता.  त्याने स्वतःची अशी जागा निर्माण केली होती. तो एक आउटसाझडर होता. "

"त्याला इनसाइडर होण्याची आवश्यकता वाटली नाही. यांचे प्रमुख कारण असे होते की  चित्रपट क्षेत्र हे त्यांचा आयुष्यातील लहान भाग होता. त्याच्यासाठी चित्रपट क्षेत्राच्या बाहेरील जग महत्वाचे होते.  त्याचे मिळालेले यश कधीही त्यांच्या डोक्यात गेले नाही.  एकदा तो एका पुरस्कार वितरण समारंभातून बाहेर चालला गेला होता, कारण त्याला त्याठिकाणचा कंटाळा आला होता. त्याचे यशाचे मोजमाप करणे कठीण आहे. तो एक उत्तम कवी होता, गिटारवादक होता. त्याला दोन्ही हातांनी लिहिता येत होते, " असे रोहिणी अय्यर हीने लिहिले आहे. 

हेही वाचा : विधानपरिषद ही ब्याद नकोच : राजू शेट्टी 

पुणे : "आजपर्यंत मी अनेक प्रसंगाना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात, पण घरच्या कटारीचे भाव जिव्हारी लागतात. स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच," असं माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांपूर्वी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेला विधानपरिषद जागेचा प्रस्ताव राजू शेट्टी यांनी स्वीकारला. त्यांनी प्रस्ताव स्वीकारल्यानंतर त्यांचे जवळचे सहकारी सावकार मादनाईक यांनी काल त्यांच्यावर जोरदार टीका केली. "राजू शेट्टी यांनी विधानपरिषद जागेसाठी सामान्य कार्यकर्त्यांचा विचार करायला हवा होता." अस मादनाईक म्हणाले होते.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in