'राष्ट्रवादी युवती'च्या निवडी जाहीर; प्रेक्षा भांबळे परभणीच्या जिल्हाध्यक्ष

खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रेरणेने युवती काँग्रेसची स्थापना झाली. युवती काँग्रेसची स्थापना झाल्यामुळे राजकारणात येणाऱ्या युवतींची संख्या वाढत आहे.
preksha bhamble nominated as district president of rashtravadi yuvati
preksha bhamble nominated as district president of rashtravadi yuvati

 पुणे: "राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या राज्यातील काही जिल्हा आणि शहरांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी जाहीर केल्या. आगामी काळात प्रत्येक शहरात युवती पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. 

नूतन पदाधिकारी पुढीलप्रमाणे:

  • श्रेया किरण भोसले -सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष
  • नेहा मोहन शेंडे- भंडारा ग्रामीण जिल्हाध्यक्ष
  • प्रेक्षा विजयराव भांबळे - परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष
  • पूनम छगनराव रेवतकर- नागपूर शहर जिल्हाध्यक्ष
  • पल्लवी तारडे पाटील- राज्य सरचिटणीस
  • किशोरी ज्ञानदेव खैरनार -नाशिक शहाराधक्षा
  • विद्या विलास जाधव -बीड ग्रामीण जिल्हाध्यक्ष
  • पौर्णिमा सुरेशराव वहाणे- भंडारा शहर अध्यक्ष
  • सुस्मिता विक्रम दौंड- औरंगाबाद जिल्हा सरचिटणीस 
  • सायली शेंडगे -राज्य संघटक
  • श्वेता खरात- नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष
  • नूतन राठोड - वाशीम जिल्हाध्यक्ष
  • हिंदवी रविंद्र पाटील -पालघर जिल्हाध्यक्ष
  • हिमानी वाघ - धुळे जिल्हाध्यक्ष
  • अंजली पवार- धुळे कार्याध्यक्ष
  • रुपाली झालटे -धुळे शहाराध्यक्ष
  • स्मृती भालके -नंदुरबार जिल्हाध्यक्ष
  • आरती हुल्ले- सोलापूर शहर शहराध्यक्ष

"खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रेरणेने युवती काँग्रेसची स्थापना झाली. युवती काँग्रेसची स्थापना झाल्यामुळे राजकारणात येणाऱ्या युवतींची संख्या वाढत आहे. राज्यात युवतीसाठी असलेले हे एकमेव व्यासपीठ आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील सामान्य कुटुंबातील युवतींना संधी देणार हे व्यासपीठ आहे,"असे सक्षणा सलगर म्हणाल्या.

शांताबाईंना राष्ट्रवादीकडून लाखाची मदत

पुणे: परिस्थितीमुळे वयाच्या ८५ व्या वर्षीही रस्त्यावर कसरती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणाऱ्या शांताबाई पवार यांना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक लाख रुपयांची मदत सुपूर्द केली. 

ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबाबत महाविकास आघाडी सरकार संवेदनशिल आहे. त्यांना सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, असा विश्वास गृहमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.  पुण्यातील हडपसर परिसरातील शांताबाई पवार या कसरतीचे खेळ दाखवून आपल्या कुटुंबाचे पोट भरत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल होता. गृहमंत्री अनिल देशमुख यांना हे समजले. शनिवारी पुण्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी आवर्जून शांताबाईंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने त्यांना एक लाख रुपये, साडीचोळी आणि इतर मदत करण्यात आली. या वेळी आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रदेश समिती सदस्य प्रदीप देशमुख, नगरसेवक आनंद अलकुंटे आदी मापस्थित होते. देशमुख म्हणाले, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या भरोसा सेल मार्फत १५ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना मदत केली आहे.

Edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com