प्रकाश आंबेडकर लहान असताना त्यांच्या आईला धमक्या येत, अनेकदा पाठलागही झाला!

२ जानेवारी १९७८ हा दिवस मी कधीही विसरू शकतनाही. कारण या दिवशी भारतीय बौध्द महासभेच्या ऑफिसचा ताबा घेण्यासाठी ही मंडळी ऑफिसवर चाल करून आली.
 struggle of meeratai ambedkar
struggle of meeratai ambedkar

पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा असतानाही माजी खासदार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्या कुटुंबियांना मोठ्या संघर्षातून वाटचाल करावी लागली आहे. प्रकाश आंबेडकर यांचे वडिल यशवंतराव आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुबियांवर दहशत करण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या आई मिराताई आंबेडकर यांना धमक्या देण्यात येत होत्या...त्यांचा अनेकदा पाठलागही झाला...

आज ५ मे. बाबासाहेबांच्या सुनबाई असलेल्या मिराताईंचा वाढदिवस. संपुर्ण आयुष्य त्यांनी धम्म कार्यासाठी वेचले. यासंबंधाने मिराताईंची संघर्षगाथा वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी सांगितली आहे.

पातोडे यांनी म्हटले आहे की, बाबासाहेबांनी आपल्या हयातीत जे कमविले त्या वर समाजाचा पहिला अधिकार ठेवला होता, हे खरे असले तरी त्यांच्या कुटुंबाच्या वाटयावर आलेला संघर्ष प्रचंड वेदनादायी आहे. मिराताईंनी एका मुलाखतीत यासंबंधाने सांगितले आहे. 

"भैय्यासाहेबांचे (प्रकाश आंबेडकरांचे वडिल) निधन १७ सप्टेंबर १९७७ ला झाले. त्यानंतर अनेकांनी मला त्रास द्यायला सुरवात केली. दादरच्या बुध्दभूषण प्रिटींग प्रेसमधील भारतीय बौध्द महासभेचे दप्तर पळवले. एक कागदाचा तुकडा शिल्लक ठेवला नव्हता. प्रिटींग प्रेस ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालले होते. वास्तविक बाबासाहेबांनी आपल्या मुलांच्या उदरनिर्वाहासाठी प्रेस त्यांच्या नावे केली होती. त्याची कागदपत्रेही आहेत. इलेक्ट्रींसिटी बिल, म्युनिसिपल बिल, प्रॉपर्टी टॅक्स सर्टीफिकेट भैय्यसाहेबांच्या नावे होते. तरीही लोकांनी गुंड प्रवृत्तीचे दर्शन घडवले. रात्री अपरात्री टेलीफोन वरून निनावी धमक्या देणे, घराच्या दारावर थापा मारणे इत्यादी प्रकार चालवले. हे लोक इतक्या निच थराला गेले की त्यांनी माझ्या मुलांच्या जिवीताला धक्का लावायची, इजा करायची भाषा सुरू केली. त्यांची ही कारस्थाने सच्च्या आंबेडकरी अनुयायांकडून मला कळत होती. त्या अनुयायाने मला त्यांचे नाव कधीच सांगितले नाही, पण त्याने मला जी मदत केली, वेळोवेळी सावध केले, म्हणून मी माझ्या मुलांचे रक्षण करू शकले. या व्यक्तिबद्दल आजही माझ्या मनात आदराची भावना आहे. हे लोक इतक्या खालच्या थराला गेले की, त्यांनी माझा पाठलाग घरापर्यत सुरू ठेवला, धमक्या तर सतत चालू होत्या, २ जानेवारी १९७८ हा दिवस मी कधीही विसरू शकत नाही. कारण या दिवशी भारतीय बौध्द महासभेच्या ऑफिसचा ताबा घेण्यासाठी ही मंडळी ऑफिसवर चाल करून आली. त्यांना मी माझ्या आधिकारातसुनावलचं, शिवाय माझ्या तिन मुलांना समोर उभं करून, 'हात लावूनच दाखवा' असे आव्हान केले. या प्रसंगाने भेदरून एकेकाने पळ काढला."

ही मूळ मुलाखत सुर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर  पुस्तकासाठी महेश भारतीय यांनी घेतली असून संपादन ज. वि. पवार यांनी केले आहे. याचा संदर्भ देवून राजेंद्र पातोडे यांनी म्हटले आहे की, 

मिराताईंनी ती नावे सांगितली नसली तरी आंबेडकरी जनतेला ती समजावीत म्हणून आज ती जाहिर करीत आहे.
घनश्याम तळवटकर, आर.जी.रुके, दाभोळकर, नायगांवचे घनश्याम कदम यांनी मिराताईंना त्रास दिला. या सर्वांचे नेतृत्व सुमंतराव गायकवाड, आर. जी. रुके करीत होते. त्यांनी दादरच्या बुद्ध भुषण प्रिंटीग प्रेसमधील बौद्ध महासभेचे दफ़्तर पळविले. त्यांनी मिराताईंचा पाठलाग केला. २ जानेवारी १९७८ ला बौद्ध महासभेच्या कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी घनश्याम तळवटकर, आर. जी. रुके, सुमंतराव गायकवाड, सावंत, मुंबरीसकर, दाभोळकर यांनी चाल केली होती. तेव्हा मिराताईंनी तिन्ही मुलांना समोर उभं करुन त्यांचा प्रतिकार केला होता. याच लोकांनी भारतीय बौद्धमहासभेच्या अध्यक्षपदासाठी 'भैय्यासाहेबां नंतर कोण ?' हा वाद उपस्थित केला होता. या लोकांचे उमेदवार घनश्याम तळवटकर, माईसाहेब आंबेडकर आणि शंकरानंद शास्त्री हे होते. मिराताईंच्या नावाला ज. वि. पवार, गंगाधर तांबुसकर, के. टी. अहीरे, एन. जी. मेश्राम यांनी पाठींबा दिला होता म्हणुन त्या भारतीय बौद्धमहासभेच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या, असे पातोडे यांनी म्हटले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com