शोभाताई कोरे यांचे निधन; वारणा परिसरावर शोककळा

सहकार, सामाजिक, शिक्षण व महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या व वारणा महिला उद्योग समुहाच्या अध्यक्षा व मायमाऊली श्रीमती शोभाताई विलासराव कोरे उर्फ आईसाहेब ( वय -७८) यांचे सोमवारी ( ता.१२ ) रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
Shobhatai Kore Passes Away
Shobhatai Kore Passes Away

वारणानगर : सहकार, सामाजिक, शिक्षण व महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केलेल्या तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याच्या व वारणा महिला उद्योग समुहाच्या अध्यक्षा व मायमाऊली श्रीमती शोभाताई विलासराव कोरे उर्फ आईसाहेब ( वय -७८) यांचे सोमवारी ( ता.१२ ) रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.

शोभाताई कोरे गेल्या काही दिवसापासुन आजारी होत्या. सोलापूर येथे उपचार सुरु असताना सोमवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या या आकस्मिक निधनाने सहकार क्षेत्रासह संपूर्ण वारणा परिसरांवर शोककळा पसरली. वारणा उद्योग व समुहाचे प्रमुख आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉ.विनय कोरे, वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे व सोलापूर येथील सुप्रसिद्ध डॉक्टर अस्मिता कोलूर यांच्या त्या मातोश्री होत तर सावित्री महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा शुभलक्ष्मी कोरे व वारणा भगिनी मंडळाच्या उपाध्यक्षा स्नेहा कोरे यांच्या त्या सासू होत.

वारणा परिसराचे भाग्यविधाते सहकारमहर्षि स्वर्गीय तात्यासाहेब कोरे,स्व. सावित्रीआक्का आणि स्वर्गीय विलासराव कोरे यांच्या निधनानंतर संपूर्ण  वारणा उद्योग व शिक्षण समुहाची मोठी जबाबदारी शोभाताई कोरे यांच्यावरती पडली. त्यांचे चिरंजीव आमदार डॉ.विनय कोरे व निपुण कोरे यांना सोबत घेवून वारणा विविध उद्योग व शिक्षण समुहाच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले.

त्यांचे माहेर सिध्देश्वर कोरोली ( ता.खटाव,जि. सातारा ) येथील विष्णूपंत वाणी यांच्या कुटुंबातील आहे. त्या उच्चविद्याविभूषीत असून कोरे कुटुंबांत आल्यावरती अल्पावधीत त्या वारणा परिवारातील सर्वाच्या आधारवड बनल्या. सहकारमहर्षि तात्यासाहेब कोरे यांच्या महान कार्याचा, संस्कारांचा वसा व वारसा त्यांनी समर्थपणे चालवित सहकार, शिक्षण व महिला सबलीकरण या क्षेत्रात त्यांनी झोकून काम केले आहे.महिला उद्योग व शिक्षण क्षेत्रात सर्वांना मार्गदर्शक ठरलेल्या शोभाताई कोरे या वारणा समूहाबरोबर सर्वत्र ‘आईसाहेब’ या नावाने परिचित होत्या.

सहकारमहर्षि तात्यासाहेब व स्व. विलासराव कोरे यांच्या निधनानंतर तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखान्याची सन-२००४ ला जबाबदारी पडली. कारखान्याच्या अध्यक्षपदाची यशस्वीपणे १६ वर्षे धुरा आतापर्यंत यशस्वीपणे सांभाळली.साखर उद्योगाची जबाबदारी असताना त्यांच्यावरती अनेक संस्थांची जबाबदारी होती.वारणा साखर आणि वारणा बझारच्या माध्यमांतून काम करत असताना सहकार व महिला क्षेत्रातील उल्लेख कामाबददल महाराष्ट्र शासनाने गौरव केला आहे.महाराष्ट्र स्टेट को -ऑप.कंझ्युमर्स फेडरेशन व वारणा लिज्जत मुंबई या दोन्ही महत्वाच्या संस्थावर संचालिका म्हणून कार्यरत होत्या.सहकार आणि विविध क्षेत्रातील अभ्यासासाठी त्यांनी 
जपान,श्रीलंका, इंग्लंड, सिंगापूर,ऑस्ट्रेलिया आदी देशांचा अभ्यास दौरा करून त्याचा फायदा उद्योग समुहातील संस्थांच्या प्रगतीसाठी झाला.

वारणा महिला उद्योग समूहाबरोबरच वारणा बझार,चैतन्य मतिमंद मुलांची शाळा,शारदा वाचन मंदिर,निवृत्ती सह. गृहनिर्माण संस्था, महात्मा गांधी मेडिकल ट्रस्ट या सर्व संस्थाच्या त्या अध्यक्षा म्हणून पदावरती काम करत होत्या.वारण महिला उद्योग समुहाच्या माध्यमातूनं हजारो महिलांना रोजगाराची संधी देवून स्वतःच्या पायावर उभे केले आहे.वारणा लिञजत पापड,महिला पतसंस्था,भगिनी मंडळ या संस्थांच्या माध्यमातून तर महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची केले.सहकार व महिला सबलीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी गौरव केला. देशातील सहकार आणि महिला उद्योग क्षेत्रातील त्यांचे कार्य हे प्रेरणादायी असेच होते.

येथील कै.विलासराव कोरे स्मृतीवनात सांयकाळी त्यांच्यावरती विधीवत अंत्यंसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सोमवारी वारणा -कोडोलीतील सर्व व्यवहार बंद ठेवून श्रध्दाजंली वाहण्यात आली.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com