सोलापूर महिला आघाडी अध्यक्षा शैला गोडसे यांची शिवसेनेतून हकालपट्टी 

विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याबद्दल शिवसेनेने आपल्या सोलापूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा शैला गोडसे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ही हकालपट्टी केली आहे.
Shaila Godse
Shaila Godse

पंढरपूर : येथील विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याबद्दल शिवसेनेने आपल्या सोलापूर (Solapur) जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा शैला गोडसे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी ही हकालपट्टी केली आहे. Shivsena Expelled Solapur Women Wing Chief Shaila Godse

शिवसेना राज्यात (Maharashtra) महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) सहभागी आहे. या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भगिरथ भालके यांनी उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडी सहभागी असलेल्या शिवसेनेना महिला पदाधिकारी शैला गोडसे यांनी राष्ट्रवादी विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

स्वामीमानी (Swabhimani Sanghatana) शेतकरी संघटनेनेही या निवडणुकीत आपला उमेदवार दिला आहे. त्यानंतर आता आता शिवसेनेतही बंडाळी झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे बोलले जात आहे.

महायुतीमधून बाहेर पडून महाविकास आघाडीत सामील झालेल्या माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा एकदा धक्कातंत्र वापरले आहे. राज्यातील महाविकास आघाडीला मोठा धक्का देत पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. Shivsena Expelled Solapur Women Wing Chief Shaila Godse

स्वाभिमानी शेतकरी संघटना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे मंगळवारी (ता. 30 मार्च) अधिकृतरित्या स्पष्ट झाले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांच्या उमेदवारी अर्जासोबत स्वाभिमानी पक्षाचा एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आपल्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करत महाविकास आघाडीच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. 

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com