निसर्गाशी सामना करण्यासाठी आदिती तटकरेंचा ठिय्या;  आजपासून तालुक्यांचा दौरा 

काल वादळाच्या तडाख्यात मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. पण जिवीतहानी झाली नाही. श्रीवर्धन या मतदारसंघासह सर्वच तालुक्यांना फटका बसल्याचे सांगितले जाते आहेच. आदिती तटकरे आजपासून या नुकसानीची पहाणी करण्यासाठी तालुक्यांना भेटी देणार आहेत
Aditi Tatkare to Visit Cyclone Hit Tehsils from Today
Aditi Tatkare to Visit Cyclone Hit Tehsils from Today

मुंबई : निसर्ग  चक्रीवादळ रायगड परिसरात थडकणार हा हवामान खात्याचा अंदाज पाहताच २ जून रोजी असलेली कॅबिनेट बैठक आटोपून आदिती तटकरे अलिबागला मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडण्यास रवाना झाल्या. 

त्यांनी अलिबाग शहरात  मुक्काम ठोकून सर्वप्रथम प्रशासनामार्फत किनारपट्टीवरील नागरिकांना हलवले. त्यांनी रेशनव्यवस्था, टेलिफोनयंत्रणा कोलमडून पडल्या तर  काय  याची तयारी यावर सर्वप्रथम मंथन केले. वादळाची शक्यता लक्षात घेता मुंबईहून आलेल्या गावकर्यांना संस्थात्मक विलीनीकरणाऐवजी घरी पाठवले होते. त्यांची वैद्यकीय तपासणी सुरू होतीच. दिवे जावू नयेत यासाठी उर्जा विभाग सक्रीय होताच.

काल वादळाच्या तडाख्यात मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. पण जिवीतहानी झाली नाही. श्रीवर्धन या मतदारसंघासह सर्वच तालुक्यांना फटका बसल्याचे सांगितले जाते आहेच. आदिती तटकरे आजपासून या नुकसानीची पहाणी करण्यासाठी तालुक्यांना भेटी देणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com