हाथरसची पीडिता मे महिन्यात बोहल्यावर चढली असती! साखरपुडाही झाला होता! - Hatharas Rape Victim Was supposed to get married in May | Politics Marathi News - Sarkarnama

हाथरसची पीडिता मे महिन्यात बोहल्यावर चढली असती! साखरपुडाही झाला होता!

दिनेश गोगी 
रविवार, 4 ऑक्टोबर 2020

रोशनलाल हे गेल्या ३५ वर्षांपासून उल्हासनगरातील धोबीघाट परिसरात वास्तव्यास आहेत. हाथरस पथरी गावात वाल्मिकी परिवारातील केवळ चारच घरे आहेत. वाल्मिकी यांना तीन मुली आहेत. त्यापैकी एकीचे लग्न झालेले आहे. पीडिता ही सर्वात लहान होती. फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील तरुणासोबत तिचा साखरपुडा झाला होता. मे मध्ये लग्न होणार होते; पण लॉकडाऊन सुरू झाल्याने ती बोहल्यावर चढू शकली नाही

उल्हासनगर :  उत्तर प्रदेशमधील हाथरस पथरी गावातील ज्या पीडितेचा पाशवी बलात्काराने बळी घेतला. तिचा ८ महिन्यांपूर्वी साखरपुडा झाला होता. मे महिन्यात ती बोहल्यावर चढणार होती; पण लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ लांबणीवर पडला. कोरोना नसता तर तिला ५  महिन्यांपूर्वीच लग्नात आशीर्वाद दिला असता, अशी माहिती पीडितेचे मोठे काका रोशनलाल वाल्मिकी व चुलतभाऊ बलबीर वाल्मिकी यांनी दिली आहे.

रोशनलाल हे गेल्या ३५ वर्षांपासून उल्हासनगरातील धोबीघाट परिसरात वास्तव्यास आहेत. हाथरस पथरी गावात वाल्मिकी परिवारातील केवळ चारच घरे आहेत. वाल्मिकी यांना तीन मुली आहेत. त्यापैकी एकीचे लग्न झालेले आहे. पीडिता ही सर्वात लहान होती. फेब्रुवारीमध्ये दिल्लीतील तरुणासोबत तिचा साखरपुडा झाला होता. मे मध्ये लग्न होणार होते; पण लॉकडाऊन सुरू झाल्याने ती बोहल्यावर चढू शकली नाही आणि आता तिला पाशवी अत्याचारामुळे जीव गमवावा लागल्याची खंत रोशनलाल यांनी व्यक्त केली. योगी सरकारवर आपला विश्‍वास नसल्याचेही त्यांनी सांगितले.

यापूर्वीही अतिप्रसंग
बलबीर वाल्मीकी यांनी सांगितले की, यापूर्वीही एकदा शेतात गाठून पीडितेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तिच्या आईला तिच्या प्रतिकाराचा आवाज येताच अतिप्रसंग करणाऱ्यांनी पळ काढला होता. मात्र १४ सप्टेंबर रोजी तिला शेतात गाठून तिच्यावर पाशवी बलात्कार करण्यात आला. तिचे तोंड दाबून ठेवल्याने प्रतिकाराचा आवाज आला नाही. हे सांगताना बलबीर याचे डोळे पाणावले होते.

संबंधित लेख