संस्कार आहेत म्हणून तुमची थोबाडं फोडली नाहीत : यशोमती ठाकूरांनी भाजपला सुनावले - Congress Minister Yashomati Thakur Slams BJP UP MLA | Politics Marathi News - Sarkarnama

संस्कार आहेत म्हणून तुमची थोबाडं फोडली नाहीत : यशोमती ठाकूरांनी भाजपला सुनावले

अरुण जोशी
सोमवार, 5 ऑक्टोबर 2020

मुलींवर योग्य संस्कार होत नसल्याने मुलींवर बलात्कार होतात.अशा घटनाना सरकार आणि तलवारीने रोखणं अशक्य आहे अशी मुक्ताफळं भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी हाथरस प्रकरणावर उधळली होती. त्यावर यशोमती ठाकूर यांनीही जोरदार टीका केली आहे.

अमरावती  : ''भाजपने आधी त्यांच्याच पक्षातील लोकांना संस्कार शिकवावे. आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाड फोडली नाहीत. यांचे कित्येक लोक कित्येक प्रकरणात सापडतात. कुणाची सीडी बाहेर निघते तर आणखी कुणाचे काही. आम्हा महिलांनी कसे राहायचे हे अजिबात शिकवू नये,'' अशी टीका करत उत्तर प्रदेश मधील भाजपच्या त्या मुक्ताफळे उधळणाऱ्या आमदाराला राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सुनावलं आहे.

मुलींवर योग्य संस्कार होत नसल्याने मुलींवर बलात्कार होतात.अशा घटनाना सरकार आणि तलवारीने रोखणं अशक्य आहे अशी मुक्ताफळं भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी हाथरस प्रकरणावर उधळली होती. त्यावर यशोमती ठाकूर यांनीही जोरदार टीका केली आहे.

उत्तर प्रदेश मधील हाथरस मधील बलात्कार प्रकरणी देशभरात संतापाची लाट असताच भाजपचे स्थानिक आमदार सुरेंद्र सिंह यांनी काल या प्रकरणावर मुक्ताफळे उधळली आहेत.सरकार आणि तलवार अत्याचार रोखू शकत नाही.आई वडिलांनी आपल्या तरुण मुलीला संस्कारी वातावरणात राहण्याची पद्धत शिकवायला हवी अशी मुक्ताफळे सुरेंद्र सिंह यांनी उधळली आहेत.

एवढंच नाही तर हाथरस मध्ये अत्याचार झालाच नव्हता शवविच्छेदनातून त्याला दुजोरा मिळाला आहे, असेही सिंह म्हणाले होते त्यामुळे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांच्या वर देशभरातून टीका होत आहे..

हाथरस बलात्कार प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न तेथील राज्य सरकारच्या वतीने केला जाऊ शकतो. तसेच त्या पीडितेच्या कुटुंबाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्या मुळे या प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या राज्याकडे सोपवावा, अशी मागणी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख