रशियामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप भारतात आणणार : सुप्रिया सुळे

सुप्रिया सुळे यांच्याकडून स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत होत असलेली ही मदत आणि ठिकठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना आपल्या घरी पोहोचता येत आहे, हे पाहून मदतीसाठी विनंती करणा-यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावरवाढले आहे.
Supriya Sule Assures To Bring Back Stranded Students from Russia
Supriya Sule Assures To Bring Back Stranded Students from Russia

बारामती : भारतातून रशियासह संयुक्त अरब अमिरात, ऑस्ट्रेलिया, युक्रेन, फिलीपाईन्स, किरगिझीस्तान व अन्य काही देशांमध्ये टाळेबंदीमुळे अडकून पडलेल्या नागरिक, विद्यार्थी तसेच पर्यटकांना मायदेशी आणण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांचे प्रयत्न अजूनही चालूच आहेत. या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केलेल्या आवाहनाचे वृत्त 'सरकारनामा'ने प्रसिद्ध केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सर्व पालकांना आश्वस्त केले आहे. 

रशियामध्ये अडकलेल्या दोनशेहून अधिक विद्यार्थांबाबत दोन आठवड्यापीर्वीच परराष्ट्र खात्याशी पत्रव्यवहार करण्यात आला असून त्यानंतरही सातत्याने परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याशी संपर्क साधण्यात येत आहे. देशांतर्गत वेगवेगळ्या राज्यांत अडकून पडलेल्या नागरिक तसेच विद्यार्थ्यांना आपापल्या घरी आणण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून जसजशी माहिती मिळत आहे किंवा विनंती करण्यात येत आहे, त्यानुसार खासदार शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे व्यक्तीशः त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक तो पाठपुरावा करत आहे. 

सुप्रिया सुळे यांच्याकडून स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत होत असलेली ही मदत आणि ठिकठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना आपल्या घरी पोहोचता येत आहे, हे पाहून मदतीसाठी विनंती करणा-यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. रशिया मध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थांसाठी एकीकडे प्रयत्न चालू असतानाच त्यांच्या पालकांकडून 'सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी आमच्या मुलांना आणावे' अशी विनंती होत असल्याचे वृत्त आज  'सरकारनामा' वर प्रसिद्ध झाले. 

याबाबत बोलताना संबंधित सर्व पालकांना सुळे यांनी आश्वस्त केले असून कोणत्याही प्रकारची काळजी करू नये, असे आवाहन केले आहे.  परदेशात अडकलेल्या नागरिक पर्यटक आणि विद्यार्थ्यांना भारतात आणणे, आल्यानंतर सर्व सुविधायुक्त विलगिकरण कक्षात त्यांची व्यवस्था करणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि विलगिकरण कालावधी संपल्यानंतर सुरक्षितरित्या त्या सर्वांना आपापल्या घरी पोहोचवणे इथपर्यंत आवश्यक ते सर्व प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करत आहोत, आणि पुढेही करत राहू, असे सुळे यांनी सांगितले.

महाराष्ट्र सरकारचे सर्व सहकार्य 

मॉस्कोहून १७ आणि १९ जून रोजी  दोन विमाने महाराष्ट्रात परदेशातील भारतीय नागरिकांसाठी महाराष्ट्रातील विमानतळ खुली असून परदेशातून येणाऱ्या विमानांना उतरण्यास महाराष्ट्र सरकार पूर्णतः सहकार्य करत आहे. स्वतः खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी परराष्ट्र खाते तसेच नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली आहे.

त्यानुसार मुंबई विमानतळावर येत्या १९ आणि नागपूरला १७ जून रोजी मॉस्कोहुन येणाऱ्या दोन  विमानांचे उतरण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यानंतरही आणखी विमानांचे नियोजन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू असून कोणाचीही गैरसोय होणार नाही, याची ग्वाही सुळे यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com