सोलापूरच्या महापौरांनी केली कोरोनावर यशस्वी मात (व्हिडिओ)

सोलापूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा वाढतोच आहे. त्यामध्ये कर्तव्य बजावत असताना महापौरांना ही कोरोनाची लागण झाली. मात्र, आता महापौर ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. सोलापूर मधील हॉस्पिटल मधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला,
Solapur Mayor Discharged from Hospital
Solapur Mayor Discharged from Hospital

सोलापूर : सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम या कांही दिवसांपूर्वी कोरोना बाधित झाल्या होत्या. कालच सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी त्यांची भेट घेऊन चौकशी केली होती. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

सोलापूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा वाढतोच आहे.  त्यामध्ये कर्तव्य बजावत असताना महापौरांना ही कोरोनाची लागण झाली. मात्र, आता महापौर ठणठणीत बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत.  सोलापूर मधील हॉस्पिटल मधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला,  यावेळी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर फुलं उधळून त्यांचं स्वागत केलं.

२ जून ला सोलापूरच्या महापौर श्रीकांचना यन्नम यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्हआला,  त्यांच्यासोबत त्यांचे पती आणि मुलगा ही कोरोनाबाधित झाले होता. आता ते तिघेही बाहेर पडले आहेत.  दरम्यान लोकांमध्ये वावरणे मनपाच्या बैठकांना उपस्थिती लावणे यामुळे सोलापूर मनपातील नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता महापौरांनी दहा दिवसानानंतर कोरोनावर विजय मिळवला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com