पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पॅकेजमुळे शेतकरी, कामगारांना दिलासा : खासदार भारती पवारांचा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यामुळे शेतकरी, कामगारांसह सर्व घटकांना दिलासा मिळाला आहे, असे खासदार डॉ. भारती पवार यांनी सांगीतले.
BJP MP Bharati Pawar Distributed Food Grains to Needy
BJP MP Bharati Pawar Distributed Food Grains to Needy

पिंपळगाव बसवंत : जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. मात्र भारतात स्थिती नियंत्रणात आहे. याचे सर्व श्रेय केंद्र शासनाने केलेल्या उपाययोजना व जनतेत निर्माण केलेला विश्‍वास याला जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीस लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यामुळे शेतकरी, कामगारांसह सर्व घटकांना दिलासा मिळाला आहे, असे खासदार डॉ. भारती पवार यांनी सांगीतले. 

लोकशाही आघाडीच्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने दुसऱ्या टर्ममध्ये एक वर्षाचा कार्यकाळ पुर्ण केला. यानिमित्त पक्षातर्फे पिंपळगाव बसवंत येथे दिव्यांगाना धान्यवाटप करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ''पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने सर्व आघाड्यांवर मोठे काम सुरु केले आहे. त्याचे दृष्य परिणाम जनतेला दिसत आहेत. शेतकऱ्यांसाठी दिर्घकालीन उपक्रम सरकार राबवित आहे. "कोरोना'च्या संकटकाळातही मोदी सरकार सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी आहे. या संकटात सरकारने लाभार्थी व शेतकरी दोन्हींना दिलासा देण्याचे काम केले आहे. ग्रामीण भागातील जनतेला त्याचा लाभ होत असल्याचे अधोरेखित झाले आहे.''

''वीस लाख कोटाचे पॅकेज जाहीर करून देशातील शेतकरी, कामगार यांच्यासह सर्वांना दिलासा दिला आहे. रेशन दुकानांतून धान्य वाटप केले जात आहे. तळागाळातील भाजपचे कार्यकर्ते गोरगरीब, निराधाराना या कठीण प्रसंगात मदतीचा हात देत आहेत. या परिस्थितीवर शंभर टक्के माक केली जाईल,'' असेही खासदार डॉ. पवार म्हणाल्या. 

प्रश्न सोडवण्याचे माझे प्रयत्न

खासदार पवार पुढे म्हणाल्या, "वर्षभरापूर्वी मतदारांनी मला दिंडोरी मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली. या संधीचा उपयोग मी मनापासून या भागाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी केला आहे. मोदी सरकारचे निर्णय हे सर्व समाजांना न्याय देणारे आहेत. त्यातून शेती व शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी सुटल्या आहेत. कांदा व द्राक्षांच्या प्रश्‍नांवर मी संबंधीत विभागांकडे पाठपुरावा करण्याबरोबरच सरकारला काही महत्वाचे निर्णय घेण्यास भाग पाडले. शेतकरी, सामान्य नागीरकांचा आवाज बुलंद झाला याचा आनंद आहे. गेल्या वर्षभरात संसदेत विविध प्रश्‍नांवर आवाज उठवला आहे. शेतकरी व सामान्याचे प्रश्न शासन दरबारी मांडत आहे. आगामी काळात देश विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करील असा ठाम विश्‍वास वाटतो.''

यावेळी पक्षाचे युवानेते वैकुंठ पाटील, संजय वाबळे, जिल्हा संघटक बापुसाहेब पाटील, सतीश मोरे, अल्पेश पारख, चिंधु काळे, मयूर गावडे, संजय गाजरे आदी उपस्थित होते. 
... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com