विरोधकांकडे टीकेसाठी मुद्देच नाहीत- सुप्रिया सुळे.(व्हिडिओ) - Opposition have no issues for Criticism claims Supriya Sule | Politics Marathi News - Sarkarnama

विरोधकांकडे टीकेसाठी मुद्देच नाहीत- सुप्रिया सुळे.(व्हिडिओ)

मिलिंद संगई
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

रकार पडणार...या मुद्याशिवाय विरोधकांकडे टीका करण्यासारखा मुद्दाच नसल्याने व विरोधकांना त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ झालेले असल्याने त्यांना पक्षात टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने सरकार पडणार असे म्हणावे लागते, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. बारामतीतील म.ए.सो. विद्यालयात मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

बारामती : सरकार पडणार...या मुद्याशिवाय विरोधकांकडे टीका करण्यासारखा मुद्दाच नसल्याने व विरोधकांना त्यांच्या पक्षातील कार्यकर्ते अस्वस्थ झालेले असल्याने त्यांना पक्षात टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने सरकार पडणार असे म्हणावे लागते, अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली. बारामतीतील म.ए.सो. विद्यालयात मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

गेल्या वर्षभराच्या काळात महाविकास आघाडी सरकारने उत्तम काम केलेले आहे. कोविड, अतिवृष्टी या सारख्या अडचणी व संकटावर सरकारने यशस्वी मात केल्याची पावती खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिली. 

महाविकास आघाडीची अनेक आश्वासने कागदावरच असल्याचा आरोप होतो, असे विचारले असता त्या म्हणाल्या,  विरोधकांना आरोप करण्याचा अधिकार आहे पण प्रत्यक्षात तुम्ही राज्यात जाऊन पाहिले तर अशी परिस्थिती नाही, महाविकास आघाडी सरकार सर्वच पातळ्यांवर  उत्तम काम करत आहे.  परदेशातील लोक जेव्हा भारतात येतात तेव्हा जी माहिती त्यांना दिली जाते, त्यातही महाराष्ट्राने उत्तम काम केल्याचेच नमूद केलेले आहे.

आज मतदानाच्या पार्श्वभूमीवर वातावरण कसे आहे, असे विचारले असता....वातावरण चांगले आहे, हवाही स्वच्छ आहे, लॉकडाऊनमुळे प्रदूषण खूप कमी झाले आहे, महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून राज्यात वातावरण चांगले आहे, असे मिश्किलपणे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले. शिक्षक व पदवीधरांचे प्रश्न संवेदनशीलपणे मांडण्यासाठी ही निवडणूक महत्वाची असल्याचे त्या म्हणाल्या. 

वीजबिलांबाबत तुम्हाला कळेल....
वीजबिलांच्या तक्रारीबाबत ठोस निर्णय शासन घेत नाही, या बाबत त्या म्हणाल्या, आचारसंहिता असल्याने काही बाबींवर मोकळेपणाने बोलता येत नव्हते. आता आचारसंहिता संपल्यानंतर या बाबतचे धोरण आपल्याला लवकरच समजेल. 

Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख