राष्ट्रवादीच्या दीपिका चव्हाणांचे गृहमंत्र्यांना साकडे, म्हणतात....मालेगावात राखीव दले वाढवा

मालेगाव शहरातील बंदोबस्तासाठी ग्रामीण पोलिस तैनात केले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागावर अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे मोठा ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर तेथे तातडीने केंद्रीय राखीव दल अथवा राज्य राखीव दलाची संख्या वाढवावी अशी मागणी आमदार दीपिका चव्हाण यांनी केली आहे
Deepika Chavan Demands Reserve Forces in Malegaon
Deepika Chavan Demands Reserve Forces in Malegaon

सटाणा : मालेगाव शहरातील बंदोबस्तासाठी ग्रामीण पोलिस तैनात केले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागावर अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांमुळे मोठा ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर तेथे तातडीने केंद्रीय राखीव दल अथवा राज्य राखीव दलाची संख्या वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. 

यासंदर्भात त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहिले आहे. त्यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली आहे. याबाबत त्या म्हणाल्या, ''मालेगाव शहरातील जनता स्थानिक पोलिसांना जुमानत नाही. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. मालेगावमुळे लगतच्या कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्‍यता आहे. याचा विचार व्हावा. मालेगावमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ होत आहे. सर्वसामान्य जनतेचे जगणे असहाय्य झाले आहे,''

त्या पुढे म्हणाल्या, ''प्रशासनाने नागरिकांना सूचना दिल्यानंतरही नागरिक प्रशासनाला जुमानत नाहीत. त्यामुळे पोलिस प्रशासनावर त्याचा अतिरिक्त ताण पडत आहे,'' मालेगाव तालुक्‍यातील अनेक नागरिक पोलिसांच्या नजरा चुकवून विविध मार्गाने सटाणा, देवळा, कळवण, नांदगाव, मनमाड आदी तालुक्‍यांत वास्त्यव्यास येत आहेत. त्यातुन या सर्व तालुक्‍यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्‍यता आहे, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील कोरोनाचे हॉटस्पॉट बनलेल्या मालेगाव शहरात बंदोबस्तासाठी राखीव दले वाढवावीत अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. आता माजी आमदार चव्हाण यांनीही त्यात सूर मिसळला आहे. त्या म्हणाल्या,  ''बागलाण तालुक्‍यातील सटाणा शहरात मालेगावशी निगडीत असलेला कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यामुळे शहरात तपासणी सुरु आहे. अशा परिस्थितीत सटाणा व जायखेडा (ता.बागलाण) पोलिस ठाण्याचे कर्मचारी मालेगावी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. तालुक्‍यातील स्थानिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत मालेगाव शहरातील कोरोनाच्या नियंत्रणासाठी केंद्रीय राखीव दल (सीआरपीएफ) अथवा राज्य राखीव दल (एसआरपीएफ) जवानांची संख्या वाढविल्यास वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण येईल,''

पोलिसांना मूळ नेमणुकीच्या ठिकाणी पाठवा

''बागलाण तालुक्‍यातील गावांसाठी सटाणा व जायखेडा या दोन पोलिस ठाण्यांमध्ये सध्या पोलिसांचे संख्याबळ अतिशय तोकडे आहे. सटाणा शहरात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने शहर रेड झोन मध्ये आहे. पाच किलोमीटर क्षेत्र कंटेनमेंट झोन जाहीर झाले आहे. त्यामुळे बागलाण तालुक्‍यातील मालेगाव बंदोबस्तासाठी नियुक्त केलेल्या सटाणा व जायखेडा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना पुन्हा पूर्ववत त्यांच्या नेमणुकीच्या ठिकाणी पाठवावे,'' अशी मागणीही माजी आमदार सौ. चव्हाण यांनी गृहमंत्र्यांकडे केली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com