चंद्रकांतदादांनी कोथरुड मधून पुन्हा निवडून येऊन दाखवावेच; नीलम गोऱ्हेंचे आव्हान - Neelam Gorhe Challenges Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मराठा आरक्षणासंदर्भात उमुख्यमंत्री अजित पवार राजभवनावर दाखल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही थोड्याच वेळात पोचणार

चंद्रकांतदादांनी कोथरुड मधून पुन्हा निवडून येऊन दाखवावेच; नीलम गोऱ्हेंचे आव्हान

उमेश घोंगडे 
रविवार, 15 नोव्हेंबर 2020

भारतीय जनता पार्टीचे नेते रोजच सरकारवर टीका करीत आहेत.राज्य सरकार सक्षम आहे. सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे त्यांच्यातील अस्वस्थता आणखी वाढत आहे. राम कदम यांच्यासारखे लोकही टीका करीत आहेत. हिंमत असेल तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधून पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान शिवसेनेच्या प्रवक्‍त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले.

पुणे : भारतीय जनता पार्टीचे नेते रोजच सरकारवर टीका करीत आहेत.राज्य सरकार सक्षम आहे. सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे त्यांच्यातील अस्वस्थता आणखी वाढत आहे. राम कदम यांच्यासारखे लोकही टीका करीत आहेत. हिंमत असेल तर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधून पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान शिवसेनेच्या प्रवक्‍त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज दिले.

पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपा नेत्यांवर जोरदार टीका करीत भाजपा प्रदेशाध्यक्ष पाटील यांना आव्हान दिले. त्या म्हणाल्या, "राज्य सरकार योग्य दिशेने काम करीत आहेत. मात्र, भारतीय जनता पार्टीचे नेते कोणत्या ना कोणत्या कारणाने राज्य सरकारवर टीका करीत आहेत. या नेत्यांना आता कोणतेही काम उरलेले नाही. राज्य सरकार चांगले काम करीत आहे. मात्र, स्वत: सत्तेत नसल्याने भाजपाच्या नेत्यांची चिडचिड होत आहे. या भावनेतूनत ते राज्य सरकारवर चुकीच्या पद्धतीने टीका करीत आहेत. बीडमध्ये एका तरूणीवर ऍसिड व पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रकार अत्यंत निंदनीय असून त्या नराधम आरोपीला पकडल्याशिवाय पोलीस स्वस्थ बसणार नाहीत.''

किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे यांच्या नावावर असलेल्या अलिबाग येथील जमिनीचे प्रकरण उघडकीस आणले. अन्वय नाईक यांच्याकडून ही जमीन खरेदी केल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणामुळे शिवसेनेचे सर्वच नेते किरीट सोमय्या यांच्यावर चिडून आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सोमय्या यांना 'वॉर्निंग'च्या भाषेत गप्प राहण्याचा सल्ला शनिवारी दिला होता. या पार्श्‍वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी आज थेट चंद्रकांत पाटील यांनाच आव्हान दिले आहे. गेल्या काही दिवसात शिवसेना व भाजपातील आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण जोरात आहे. हे राजकारण कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्‍यता दिसत आहे.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख