'यासाठी' राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या वैतागल्या मुंबईकरांवर...!

कोरोनामुक्त जिल्हा परिषद गट म्हणून सविता बगाटे यांचा लवकरच प्रांताधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते सन्मान होणार होता. अर्थात काही दिवसांपूर्वी त्यांची जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून संधी हुकलेली असताना त्यांना कोरोनामुक्त जिल्हा परिषद गट राहण्याची इच्छा जास्त होती आणि नेमकी तीच फलद्रुप झाली नाही
NCP ZP Member Savitatai Bagate Got Irritated on Mumbaikars
NCP ZP Member Savitatai Bagate Got Irritated on Mumbaikars

शिक्रापूर : कोरोनाला २४ मार्च ते ८ जुन असे तब्बल अडीच महिने आपल्या जिल्हा परिषद गटात आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना सोबत घेवून थोपविल्यानंतर ९ जून रोजी एका वस्तीत एक मुंबईकर कोरोनाबाधित निष्पन्न झाल्याने पाबळ-केंदूर (ता.शिरूर, जि.पुणे) जिल्हा परिषद गटाच्या सदस्या सविता बगाटे या अक्षरश: वैतागल्या आहेत. 

कारण त्याचे असे की, कोरोनामुक्त जिल्हा परिषद गट म्हणून त्यांचा लवकरच प्रांताधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते सन्मान होणार होता. अर्थात काही दिवसांपूर्वी त्यांची जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून संधी हुकलेली असताना त्यांना कोरोनामुक्त जिल्हा परिषद गट राहण्याची इच्छा जास्त होती आणि नेमकी तीच फलद्रुप झाली नाही.

अडीच महिने थोपवले कोरोनाला

पुणे जिल्ह्यात २४ मार्च रोजी तालुक्यातील पहिला कोरोना रुग्ण सापडलेल्या व पुढील काळात तब्बल ११ रुग्ण व एक कोरोनामुळे मृत्यूमुळे गाजलेल्या शिक्रापूर-सणसवाडी जिल्हा परिषद गटाशेजारीच असलेल्या पाबळ-केंदूर गटाकडे तालुका प्रशासन गंभीरपणे लक्ष ठेवून होते. दोन्ही गटातील बाजार-रहाट आणि ये-जा खुपच असल्याने या गटातही कोरोनाची शक्यता होती. याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे यांनी स्वत: पुढाकार घेवून केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य कर्मचारी-अधिकारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषदेचा शिक्षकवॄंद, शिक्रापूर पोलिस यांना सोबत घेतले व संपूर्ण गटाच्या कोरोना संसर्गाबाबत दक्षता उपययोजनांसाठी पुढाकार घेवून तब्बल अडीच महिने कोरोनाला थोपविले. 

सन्मानाचे स्वप्न भंगले

मात्र  ८ रोजी थिटेवाडी येथे एक मुंबईकर रुग्ण कोरोनाबाधित असल्याचा खाजगी लॅबचा रिपोर्ट प्राप्त झाल्याने त्याला पुण्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले. दरम्यान संबंधितावर उपचार चालू असताना त्याचा आता एनआयव्हीचा अहवालही प्रतिक्षेत असून त्याचा कुटुंबातील काही जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुढील कार्यवाही सुरू असली तरी कोरोनामुक्त जिल्हा परिषद गट म्हणून सन्मान घेण्याचे स्वप्न भंगल्याने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिवंगत बापूसाहेब थिटे यांच्या परिवारातील माहेर व त्यांच्याच राजकीय वारसदार समजल्या जाणा-या सविता एकनाथराव बगाटे वैतागलेल्या आहेत त्या केवळ कोरोना पाबळ-केंदूर गटात आणलेल्या मुंबईकरांवर!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com