'कोरोना'चा विचार करा, शाळेत निम्मीच फी भरा! नाशिक जि.प.ची शाळांना सूचना

खाजगी शाळांनीही आपली शैक्षणीक जबाबदारी ओळखावी. जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळांनी यंदा फी वसुलीपेक्षा मुले शाळेत कसे येतील याला प्राधान्य द्यावे. निम्मीच फी घ्यावी. अशा सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.
Nashik ZP Education Committee Chairman Surekha Darade Asks School to Charge Half of the Fee
Nashik ZP Education Committee Chairman Surekha Darade Asks School to Charge Half of the Fee

नाशिक : ''कोरोना संसर्गाचा विचार करता यंदाचे वर्षे फक्त अडचणींशी लढण्यातच जाणार आहे. रोजगार नाही तर पैसे नाही, पैसे नाही म्हणून मुले शाळेत येणार नाहीत. हे टाळले पाहिजे. त्यासाठी खाजगी शाळांनीही आपली शैक्षणीक जबाबदारी ओळखावी. जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळांनी यंदा फी वसुलीपेक्षा मुले शाळेत कसे येतील याला प्राधान्य द्यावे. निम्मीच फी घ्यावी.'' अशा सूचना जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी प्रत्येकाने करावी असे सबापती सुरेखा दराडे यांनी यावेळी सांगीतले. 

जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक सभापती सुरेखा दराडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी जिल्ह्यातील शाळा केव्हा सुरु होणार हे अद्याप स्पष्ट नाही. त्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी काल जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची बैठक झाली. या बैठकीत यंदा जिल्हा परिषदेच्या शाळा सुरु करण्याची तयारी प्रशासन करीत आहे.

खाजगी शांळांकडून त्यासाठी तयारी झाली आहे. सध्या ऑनलाईन साहित्य व पुस्तके वाटपाचे काम शिक्षक करीतआहेत. मात्र जिल्ह्याच्या जवळपास सर्वच तालुक्‍यांत कोरोनाचा संसर्ग झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार का?. हा प्रश्‍न आहे.

रोजगार नसल्याने फी भरणे अवघड

शेतकऱ्यांनी मुलांना पाठवले तरीही कोरोनामुळे रोजगार नाही. रोजगार नसल्याने पैसे नाही. अशा स्थितीत अनेक मजूर पाल्यांना शाळेत पाठविण्याएैवजी मजूरीला पाठवू शकतात. हे शैक्षणीक आव्हान आहे. त्यावर प्रत्येक घटक व शैक्षणीक संस्थांनी उपाययोजना करावी, अशा सूचना सभापती दराडे यांनी दिल्या. 

५० टक्के शुल्क आकारणीचा ठराव मंजूर

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहराबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. लोकांच्या हातात पैसा नसल्याने अनेक पालकांना खासगी शाळांचे शैक्षणिक शुल्क भरणे अशक्‍य झाले आहे. त्यात नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत अर्धे वर्ष संपणार असून, जिल्ह्यातील खासगी शाळांनी यंदा ५० टक्केच शुल्क आकारावे, असा ठराव जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. 

सदस्यांनी निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांचे मोठे नुकसान झाल्याच्या तक्रारी केल्या. या शाळांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ५० लाख रुपयांच्या निधीची आवश्‍यकता असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. त्यावर या निधीच्या मागणीसाठी ठरावही करण्यात आला.

कोरोनाच्या फैलावामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील रोजगाराला मोठा फटका बसला आहे. बाजार समित्या बंद आहेत. भाजीपाला, अन्न धान्याला भाव नाही. यावर चर्चा झाली.समितीच्या बैठकीस सदस्या मीना मोरे, मनीषा पवार, जे. डी. हिरे, सुनीता पठाडे व गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.

... 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com