महिला राजकारणात आल्या तरच त्यांचे प्रश्न सुटतील..

महिला राजकारणात आल्या, तर मतदानाचा टक्का वाढतो , असे उमा खापरे म्हणाल्या.
uma8.jpg
uma8.jpg

पिंपरी : महिलांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी त्यांनी राजकारणात आलंच पाहिजे. तसेच राजकारण हे समाजकारणही असल्याने तरुणी व महिलांनी त्यात आवश्य यावे, असे स्पष्ट मत भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी व्यक्त केलं आहे. महिला दिनानिमित्त (ता.८) 'सरकारनामा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या बोलत होत्या.

महिला राजकारणात आल्या, तर मतदानाचा टक्का वाढतो. या महिला मतदानाच्या जोरावरच भाजप बिहारात सत्तेत आला आहे, असे खापरे म्हणाल्या. म्हणूनच महिला डॉक्टर, वकील, पत्रकार, आयटी कर्मचारी, बचत गटाच्या सदस्या, नर्सेस यांना प्रकोष्ठ महिला म्हणून नेमून त्यांना पक्षात व पर्यायाने राजकारणात आणण्याची सूचना महिला मोर्चाच्या सर्व जिल्हाध्य़क्षांना खापरे यांनी दिली आहे.

सर्वसामान्य स्त्रीला तसं कोणी उभं करत नाही. मात्र, राजकीय दबाव आणला , तर पिडीतेला न्याय मिळू शकतो. घरात बसून तक्रार करण्यापेक्षा स्वत बाहेर पडून तक्रारीचे निवारण करू शकता. म्हणून महिलांनी राजकारणात आलं पाहिजे, असे खापरे म्हणाल्या. मानसन्मान दिला आणि जूळवून घेतलं, तर महिला असल्या, तरी राजकारणात त्रास होत नाही, असा असे त्या म्हणाल्या. नगरसेवक ते महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा असा त्यांचा २३ वर्षाचा राजकीय प्रवास आहे. राजकीय पार्श्वभूमी नसतानाही फक्त कामाच्या जोरावर त्यांना पदे मिळत गेली. ती मागण्याची वेळच त्यांच्यावर आली नाही, असं त्या म्हणतात. 

चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह प्रभाग १९९७ ला महिलांसाठी राखीव झाला अन तेथून त्या भाजपकडून नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्याचवर्षी त्या भाजपच्या महिला मोर्चाच्या शहर उपाध्यक्षा झाल्या. दुसऱ्या वर्षी कांता नलावडे महिला मोर्चाच्या अध्यक्षा असताना त्या प्रदेशच्या कोषाध्यक्षा व नंतर उपाध्यक्षाही झाल्या. तीनदा सरचिटणीस राहिल्या. २००२ ला दुसऱ्यांदा त्या नगरसेविका झाल्या. त्या वर्षी त्या विरोधी पक्षनेत्याही बनल्या. रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्ष असताना त्यांच्या फादर बॉडीत त्यांनी चिटणीस म्हणून काम केले. सहा वर्षे महिला मोर्चाच्या सोलापूर प्रभारी होत्या. ३ जुलै २०२० ला त्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा झाल्या. गोवा, झारखंड, दिल्ली, राज्यस्थान, गुजरात येथील विधानसभा निवडणुकीत प्रचाराचेही काम त्यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com