माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांची राजकारणातून निवृत्ती

या पुढे नव्या पिढीसाठी काम करीन. घरी बसणार नाही.बसून कुरवळण्या एवढे काही नाही माझ्या जवळ.विचारांची शिदोरी घेऊन आज मी माझे राजकारण थांबवीत आहे. सगळ्या सहप्रवासी सहकाऱ्यांचे हार्दिक आभार... असे लिहित माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे
Ex Central Minister Surykanta Patil Announces Retirement from Politics
Ex Central Minister Surykanta Patil Announces Retirement from Politics

पुणे : ना कीसींसे दोस्ती...ना किसींचे बैर..... 
या पुढे नव्या पिढीसाठी काम करीन. घरी बसणार नाही. बसून कुरवळण्या एवढे काही नाही माझ्या जवळ. विचारांची शिदोरी घेऊन आज मी माझे राजकारण थांबवीत आहे. सगळ्या सहप्रवासी सहकाऱ्यांचे हार्दिक आभार... असे लिहित माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर करत सगळ्यांना धक्का दिला आहे. 

आपल्या फेसबूक पेजवरुन त्यांनी एक पोस्ट लिहित त्यांनी राजकारणातून निवृत्त होत असल्याचे संकेत दिले आहेत....या पोस्टमध्ये त्या म्हणतात....

आता थांबावे असे वाटत नाही, ना किसींसे दोस्ती ना किसींसे बैर खूप प्रेम मिळाले.... जळणारे होते. पण प्रेम करणाऱ्यांची संख्या अधिक होती मला ते सर्व मिळाले जे एक सामाजिक जीवनात असणाऱ्या व्यक्तीला मिळायला हवे

...43  वर्ष राजकारणात होते एखाध्या राजकुमारी सारखी राहिले. 400 रुपयांची साडी 4000 हजाराच्या थाटात नेसली मिळालेले काम मन लावून केले. आता आजूबाजूला असणारे लोक अनोळखी वाटत आहेत आणि अश्या अनोख्या प्रांतात माझ्या सारखी मनस्वी रमू शकत नाही. राजीनामा लिहून तयार होता पण मी आहेच कोण, म्हणून एवढा  शो करायचा? सगळ्यांनीच प्रेम दिले सन्मान दिला. काहीच तक्रार नाही. आपलीच लायकी नाही हे समजले होते. रागात घेतलेले निर्णय असेच असतात. ते योग्य की अयोग्य हे सारासार बुद्धीला जेव्हा ठरविता येते. नाही तिथे तोंडाला नवा रंग लावून विचार बदलत नाहीत हे पक्के समजलंय.

...त्यामुळे धाकटे लोक राजकारण सोडतो म्हणत असताना मला आता काय मिळवायचे आहे? एकटीने सगळे जिंकले. लोकांना कंटाळा येईपर्यंत प्रवास  करायची माझी तयारी नाही. ज्यांच्यासाठी काम केले त्यानी सन्मानही केला आणि आज जे नाहीच आहेत, त्यांच्या आठवणी मनात आहेत. आपण फार खुज्या प्रांतात प्रवासी झालो याची खंत आहे. पण माझा निःस्वार्थ प्रवास मला फार समृद्ध करून गेला. जेव्हा लिहायचे तेव्हा लिहिलं. पण आज मी माझा राजकीय प्रवास थांबवित आहे. या पुढे नव्या पिढीसाठी काम करीन. घरी बसणार नाही. बसून कुरवळण्या एवढे काही नाही माझ्या जवळ. विचारांची शिदोरी घेऊन आज मी माझे राजकारण थांबवीत आहे. सगळ्या सहप्रवासी सहकाऱ्यांचे हार्दिक आभार. मी आहे. कधीही या घर आणि मी तुमचीच आहे. नमस्कार सगळ्यांना.... थांबते!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com