एरव्ही भांडणाऱ्या 'मैत्रिणीं'चा दिसून आला जिव्हाळा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर सध्या रुबी हाॅल क्लिनिकमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना माजी प्रदेशाध्यक्षा व आताच्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. मध्यंतरी दोघींमधले ट्वीटर वाॅर चांगलेच गाजले होते.
Chitra Wagh Wishes good health for Roopali Chakankar
Chitra Wagh Wishes good health for Roopali Chakankar

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या माजी प्रदेशाध्यक्षा आणि दुसऱ्या विद्यमान अध्यक्षा यांच्यातला जिव्हाळा समोर आला आहे. एरव्ही ट्वीटरवरुन भांडणाऱ्या या दोघी मैत्रिणींपैकी एकजण आजारी पडल्यानंतर दुसऱ्या मैत्रिणीने ट्वीट करुन आपली राजकारणापलीकडची मैत्री दाखवून दिली. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे, हे पुन्हा एकदा यामुळे अधोरेखित झाले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर सध्या रुबी हाॅल क्लिनिकमध्ये उपचार घेत आहेत. त्यांना माजी प्रदेशाध्यक्षा व आताच्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीटरवरुन शुभेच्छा दिल्या आहेत. मध्यंतरी दोघींमधले ट्वीटर वाॅर चांगलेच गाजले होते. कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी पुढाकार घेणाऱ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रविवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

रुपाली चाकणकर यांना कोरोना किंवा अन्य कोणताही गंभीर आजार नसल्याचे डॉक्टर आणि कुटुंबियांकडून सांगण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून आगामी दोन दिवसांत त्यांना घरी सोडण्यात येण्यात येणार असल्याचे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 

विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील येथे प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळून हत्या करण्याचा प्रयत्न घडलेल्या घटनेप्रकरणी  भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर यांच्यात शाब्दिक युद्ध झाले होते. इतकेच नाही तर भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली चाकणकर या 'बावळट' आहेत, अशी टीका त्यावेळी केली होती. 'चित्रा वाघ या ओव्हर स्मार्ट आहेत. त्यामुळे त्यांना सर्वजण बावळट दिसतात. भाजपचे सरकार आले नाही म्हणून त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे त्यात त्या इतरांना बावळट म्हणत आहेत,' असे प्रत्युत्तर चाकणकर यांनी दिले होते. 

मात्र, रुपाली चाकणकर यांना रुबी हाॅल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केल्याचे समजताच चित्रा वाघ यांनी काळजी व्यक्त करणारे ट्वीट केले. 'माझी मैत्रिण जुनी सहकारी रुपाली चाकणकर हिला प्रकृती अस्वस्थतेमुळे रूबी हॉल क्लिनीक येथे दाखल केल्याचे समजले. लवकरात लवकर प्रकृतीत सुधारणा होऊन बरी हो हिचं परमेश्वराकडे प्रार्थना...' असे म्हणत चित्रा वाघ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com