यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घेणारच : चंद्रकांत पाटील - Chandrakant Patil Demands Resignation of Yashomati Thakur | Politics Marathi News - Sarkarnama

यशोमती ठाकूर यांचा राजीनामा घेणारच : चंद्रकांत पाटील

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलिस मारहाण प्रकरणी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज अमरावती मधील तिवसा येथे दिला.

अमरावती : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलिस मारहाण प्रकरणी तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांनी राजीनामा दिल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज अमरावती मधील तिवसा येथे दिला.

मंत्री यशोमती ठाकूर यांच्या राजीनाम्याची मागणी मागील काही दिवसांपासून भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. आज अमरावती जिल्ह्यात चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात तिवसा येथे आंदोलन करण्यात आले. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी 2012 मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. त्यानंतर आता  यशोमती ठाकूर यांना अमरावतीच्या न्यायालयाने तीन महिन्याची शिक्षा सुनावली आहे. 

दरम्यान यशोमती ठाकूर यांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा यासाठी भाजप कडून आंदोलन केले जात आहे. चंद्रकांत पाटील यांनी देखील आज आंदोलनाला भेट देऊन यशोमती ठाकूर यांनी यांनी राजीनामा द्यावा त्यांना  न्यायालयाने  शिक्षा सुनावली असताना त्यांना मंत्री पदावर राहण्याचा अधिकार नसून नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असे चंद्रकांत पाटील म्हणाले .जोपर्यंत मंत्री राजीनामा देणार नाही तोपर्यंत भाजप स्वस्थ बसणार नाही असा इशाराही चंद्रकांत पाटील यांनी दिला.दरम्यान यशोमती ठाकूर यांचा राजीनामा तर काढून घेतला तर काँग्रेस सत्तेतून बाहेर पडेल अशी भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असल्यामुळे यशोमती ठाकुरांचा राजीनामा घेत नसल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख