राठोडांच्या राजींनाम्यानंतर पंकजा मुंडेंचं ट्वीट ; रोख मात्र धनंजय मुंडेंकडे...! - Pankaja Munde Targets Dhananjay through Tweet | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्र्यांकडून 5 हजार 400 कोटींचे पॅकेज जाहिर...
पुढील 15 दिवस संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार...
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू ठेवणार...
नोंदणीकृत घरगुती कामगारांनाही आर्थिक मदत देणार...
नोंदणीकृत फेरीवाल्यांनाही पंधराशे रुपयांची मदत मिळणार...
परवानाधारक रिक्षाचालकांना पंधराशे रुपये देणार...
पुढील महिनाभर गरीबांसाठी मोफत शिवभोजन थाळी...दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू मिळणार
राज्यात उद्या रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी...मुख्यमंत्र्यांची घोषणा

राठोडांच्या राजींनाम्यानंतर पंकजा मुंडेंचं ट्वीट ; रोख मात्र धनंजय मुंडेंकडे...!

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 मार्च 2021

''एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशिराने का होईना ओलांडली आता निष्पक्षपातीपणे चौकशी चा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे.. सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दुरवस्था आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही,''असे म्हणत पंकजा यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

पुणे : टीकटाॅक स्टार पूजा राठोड मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे संजय राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईची मागणी करत आहेत. मुंडे यांच्या भगिनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर ट्वीट करताना धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

''एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशिराने का होईना ओलांडली आता निष्पक्षपातीपणे चौकशी चा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे.. सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दुरवस्था आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही,''असे म्हणत पंकजा यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

संजय राठोडांबाबत उद्धव ठाकरेंनी जे केलं ते आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं पाहिजे. पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला हवा होता, असं विधान काल राठोड यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्याचा दाखला देत पंकजा यांनी ट्वीट केलं आहे.

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात आरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आला. मग, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंबाबत वेगळी भूमिका का? असा प्रश्न काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला होता. त्यावर धनंजय मुंडे यांच्याबाबत करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यात आलेली आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्‍नच नाही, असं उत्तर ठाकरे यांनी दिलं होतं.
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख