मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीवर निर्णय नाही  : सर्व जण मिळून निर्णय घेणार  - No Decision yet about Medha Kulkarni Candidature Say Chandrakant Patil | Politics Marathi News - Sarkarnama

मेधा कुलकर्णी यांच्या उमेदवारीवर निर्णय नाही  : सर्व जण मिळून निर्णय घेणार 

सागर आव्हाड
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

भारतीय जनता पक्षात संघटना ठरवेल तो उमेदवार असतो. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मार्च महिन्यात होईल असा अंदाज आहे. त्यामुळे आता पासूनच उमेदवार ठरवण्यात काही अर्थ नाही, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे केले

पुणे : भारतीय जनता पक्षात संघटना ठरवेल तो उमेदवार असतो. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मार्च महिन्यात होईल असा अंदाज आहे. त्यामुळे आता पासूनच उमेदवार ठरवण्यात काही अर्थ नाही, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना पदवीधरसाठी उमेदवारी मिळणार का, या प्रश्नावर त्यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले. 

पुण्यातील बोपोडी मध्ये पुणे शहर भाजप तर्फे पदवीधर मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आले. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अभियानाला सुरवात आज सुरवात झाली. यावेळी पोलीस भरती ऑनलाइन मोफत कोर्स अॅप्लिकेशन च झालं उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक प्रकाश ढोरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पक्षात संघटना ठरवेल तो उमेदवार असतो. पदवीधर मतदारसंघाची निवडणूक मार्च महिन्यात होईल असा अंदाज आहे त्यामुळे आता पासूनच उमेदवार ठरवण्यात काही अर्थ नाही. पक्षाने निवड केलेला उमेदवार निवडून येईल.. त्यामुळे आतापासून आम्ही नाव जाहीर करण्याची घाई करणार नाही, असे ते म्हणाले. 

''जगामध्ये १८२ देश आहेत आणि त्यात सर्व देशांचे राष्ट्रप्रमुख संजय राऊत आहेत. अनेक वर्षानंतर या जगामध्ये संजय राऊतांसारखे व्यक्तिमत्व निर्माण झाले आहे. त्यांच्याकडे फक्त भारतातल्या, महाराष्ट्रातल्या नाही तर संपूर्ण जगातल्या विषयावर मत आहे.'' असे संजय राऊत करीत असलेल्या टीकेबद्दल विचारले असता पाटील यांनी सांगितले. 

सीमा भागात आज काळा दिवस पाळला जात आहे. त्याबदद्ल विचारले असता पाटील म्हणाले, ''अनेक गावात कन्नड भाषिक अधिक आहेत ती गावे स्वाभाविकपणे कर्नाटकमध्ये केली.बेळगाव सहित 800 गाव अशी आहे महाराष्ट्रात आली पाहिजेत अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. इतक्या वर्षानंतर सुद्धा या गावातील मराठी भाषिकांची महाराष्ट्र येण्याची अपेक्षा आहे,'' असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख