पंतप्रधानांना आपल्या सरकारचं काम आवडलंय : सुप्रिया सुळेंचा टोमणा

देशाचे पंतप्रधान आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम होतंय हे बघण्यासाठी येणार आहेत. पंतप्रधान वेगळ्या विचारांचे असले तरी देखिल त्यांना आपलं पुणं हवंहवंसं वाटतंय, असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
Narendra Modi - Supriya Sule
Narendra Modi - Supriya Sule

बारामती : देशाचे पंतप्रधान येत्या शनिवारी २८ नोव्हेंबर रोजी  पुण्याला येत आहेत. कदाचित ते आपले कौतुक करायला येणार असतील. मी त्यांच्या दौऱ्याचा चांगला अर्थ काढते. आपल्या सरकारला एक वर्ष होणार  आहे आणि देशाचे पंतप्रधान आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम होतंय हे  बघण्यासाठी येणार आहेत. पंतप्रधान वेगळ्या विचारांचे असले तरी देखिल त्यांना आपलं पुणं हवंहवंसं वाटतंय, असा टोमणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. 

महाविकास आघाडीच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात  खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी  राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे उपस्थित होते. यावेळई सुप्रिया सुळे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यावर भाष्य केले. 

महाविकास आघाडीचे सरकार लवकरच पडणार असं भाजपचे नेते सांगत आहेत. त्याबद्दल त्या म्हणाल्या की, जी भांडी मोकळी असतात ती फार वाजतात अशा आशयाची म्हण इंग्रजीत आहेत. त्यामुळे त्यांना आवाज जितका करायचा आहे, तितका करू दे. सरकार पडलं तर बघू काय करायचं ते. असं थोडंच आहे की जन्माला आलोय म्हणून आयुष्यभर सत्तेत रहायचं. आज आमची टर्म आहे. कधीतरी त्यांची येईल. असे म्हणत महाविकास आघाडीचं सरकार स्थिर व टिकणारे असल्याचा निर्वाळा सुळे यांनी दिला.
Edited By - Amit Golwlakar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com