गणेश चतुर्थीपूर्वी माझे नवीन गाणे येणार : अमृता फडणवीस

या पॅकेजमध्ये महावसुली नसेल, तर निधी संबंधितांपर्यंत उपलब्ध व्हायला हवा.
My new song will come before Ganesh Chaturthi : Amrita Fadnavis
My new song will come before Ganesh Chaturthi : Amrita Fadnavis

पुणे  ः  आगामी गणेश चर्तुथीच्या आधी माझे नवीन गाणे येणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुण्यात बोलताना दिली. (My new song will come before Ganesh Chaturthi : Amrita Fadnavis)

पुण्यात एका कार्यक्रमासाठी आलेल्या अमृता फडणवीस या पत्रकारांशी बोलत होत्या. त्यावेळी त्यांना आगामी काळात आपले नवीन गाणे येणार आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.

पुण्यातील मेट्रोवरून सुरू असलेल्या श्रेयवादावर फडणवीस म्हणाल्या की, असंच होतं, कामं कोणी करतं आणि हार कोणीतरी दुसरंच घालून जातं. पूरग्रस्तांना दिलेले पॅकेज पुरसे आहे का, या प्रश्नावरूनही त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की या पॅकेजमध्ये महावसुली नसेल, तर निधी संबंधितांपर्यंत उपलब्ध व्हायला हवा. महावसुली असेल तर काही सांगू शकत नाही.

भाजपबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी नाही, त्यामुळे भाजप अजित पवारांबरोबर पुन्हा जाऊन सरकार बनविणार का, यावर काहीसे मजेशीर उत्तर अमृता फडणवीस यांनी दिले. त्या म्हणाल्या की, मी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दिल्लीत जाऊन चर्चा करते आणि त्यानंतर तुम्हाला कळविते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना भेटले. दिल्लीतील गाठीभेटीवरून तुम्हाला वाटतं का की राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पडेल आणि भाजपचे सरकार सत्तेवर येईल. या प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, जे नेते दिल्लीत सध्या भेटत आहेत, ते आधीपासून एकमेकांना भेटत आहेत. असं नाही की ते अचानक आताच भेटत आहेत, त्यामुळे त्यावरून सरकार स्थापनेबाबत निष्कर्ष काढणे योग्य नाही. पण, हे खरे आहे की राज्यातील महाविकास आघाडीचे जे सरकार आहे, ते अत्यंत कुमकवत आहे. ते कधी पडते आणि कधी नाही, याचा ध्यास प्रत्येकाला लागलेला आहे. महाविकास आघाडी सरकार पडले तर भारतीय जनता पक्ष एक चांगला पर्याय देईल, असे त्यांनी सांगितले आहे.

राज्यपालांवर टीका करणे योग्य नाही

राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या दौऱ्यावर राज्य सरकारकडून टीका केली जात आहे, त्याबाबत अमृता फडणवीस म्हणाल्या की, राज्यपाल कोशियारी यांच्यासारखा निष्ठावान आणि कर्तृत्ववान माणूस मी पाहिलेला नाही. राज्य सरकारकडून राज्यपालांना होणारा विरोध हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. सरकारच्या मागण्या राज्यपाल कोशियारी यांच्याकडून पूर्ण होत नसल्याने बहुतेक ते या माध्यमातून राज्यपालांवर राग व्यक्त करत असतील. पण, राज्यपालांसारख्या व्यक्तीवर टीका व्हायला नको, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com