डावलले जात असल्याच्या भावनेतून मेधा कुलकर्णींची कार्यक्रमाला गैरहजेरी

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आमदारकीच्या पहिल्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन सोमवारी पुण्यात झाले. या कार्यक्रमाला कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या अनुपस्थितीची चर्चा मतदारसंघात जोरात सुरू झाली आहे
Chandrakant Patil - Medha Kulkarni.
Chandrakant Patil - Medha Kulkarni.

पुणे : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आमदारकीच्या पहिल्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन सोमवारी पुण्यात झाले. या कार्यक्रमाला कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या अनुपस्थितीची चर्चा मतदारसंघात जोरात सुरू झाली आहे. 

कार्यक्रमाचे कुलकर्णी यांना निमंत्रण देऊनही त्या आल्या नाहीत, असे पाटील यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. मात्र, गेल्या वर्षभरापासून आपल्याला डावलेले जात आहे तसेच भेट मागूनही कुलकर्णी यांना चंद्रकात पाटील यांच्या भेटीची वेळ मिळत नसल्याच्या नाराजीतून त्या कालच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितल्यानुसार कोथरूडमधून निवडणूक लढल्याचे पाटील यांनी सोमवारच्या कार्यक्रमात स्पष्ट केले. याआधीदेखील त्यांनी या प्रकारचे स्पष्टीकरण अनेकवेळा दिले आहे. कोल्हापूर शहर किंवा जिल्ह्याच्या कोणत्याही मतदारसंघातून लढण्याची आपली तयारी होती. मात्र, पक्षाचे तेव्हाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पुण्यातून कोथरूडमधूनच लढण्याचा आदेश दिल्याने आपण पुण्यात काथरूडमध्ये आल्याचे पाटील यांनी सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. 

मात्र, आपली उमेदवारी जाणीवपूर्वक कापण्यात आल्याची भावना कुलकर्णी यांच्या मनात घर करून आहे. गेल्या वर्षाभरात झालेल्या अनेक कार्यक्रमांना आपणास टाळण्यात आल्याचा कलकर्णी यांची भावना आहे. या संदर्भात माध्यमांशी थेट बोलायला त्या तयार नाहीत. मात्र, त्यांच्याकडून वेळोवेळी आपणास टाळण्यात येत असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आली आहे. सोमवारच्या कार्यक्रमाचे निमंत्रण कुलकर्णी यांना देण्यात आले होते. मात्र, भेटण्यासाठी वेळ मागूनही पाटील यांच्याकहून वेळ मिळत नसल्याने आणि आपल्याला डावलले जात असल्याच्या भावनेतून या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय कुलकर्णी यांच्या वतीने घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंघात गेल्या वर्षभरात शेकडो कार्यक्रम झाले. वर्षभरात सेवा सप्ताहाचे १५७ कार्यक्रम झाले. मात्र, या कार्यक्रमांना बोलावण्यात आले नाही. त्यामुळे आपल्याला टाळण्यात येत असल्याची कुलकर्णी यांची भावना आहे. या संदर्भात तसेच मतदारसंघातील कामासंदर्भात कुलकर्णी यांना पाटील यांची भेट हवी आहे. मात्र, ही भेटच मिळत नसल्याचे कुलकर्णी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी कुलकर्णी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला पाटील यांनी आवर्जून उपस्थिती लावली. पाटील यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्धाटन झाले. त्यानंतर तरी समन्वयाचे वातावरण राहील अशी अपेक्षा असताना ही दरी वाढतच चालल्याचे दिसत आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com