शय्यासोबत केली की बाॅलीवूडमध्ये दोन मिनिटांची भूमीका मिळते - कंगना राणावत - Kangana Ranaut Answers Jaya Bacchan | Politics Marathi News - Sarkarnama

शय्यासोबत केली की बाॅलीवूडमध्ये दोन मिनिटांची भूमीका मिळते - कंगना राणावत

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

''मी माझी थाळी स्वतः सजवली. या इंडस्ट्रीला मी स्त्रीवाद शिकवला. देशभक्तीपर आणि महिला प्रधान चित्रपटांतून मी आपली थाळी सजवली. ही माझी थाळी आहे. जयाजी आपली नाही,'' असे म्हणत कंगनाने श्रीमती बच्चन यांच्यावर टीका केली आहे.

पुणे : चित्रपट उद्योगाने कुठली थाळी दिली? हिरोबरोबर शय्यासोबत केली की दोन मिनिटांची भूमीका किंवा एखादा आयटम नंबर मिळतो, असे ट्वीट करत अभिनेत्री कंगना राणावतने राज्यसभा सदस्य जया बच्चन यांना सुनावले आहे. काल जया बच्चन यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणातील टीकेला कंगनाने उत्तर दिले आहे. 

''मी माझी थाळी स्वतः सजवली. या इंडस्ट्रीला मी स्त्रीवाद शिकवला. देशभक्तीपर आणि महिला प्रधान चित्रपटांतून मी आपली थाळी सजवली. ही माझी थाळी आहे. जयाजी आपली नाही,'' असे म्हणत कंगनाने श्रीमती बच्चन यांच्यावर टीका केली आहे.

बॉलिवूडमधील लोकांना सोशल मीडियातून लक्ष्य केले जात आहे याबद्दल जया बच्चन यांनी राज्यसभेत बोलताना चिंता व्यक्त केली होती. ज्या ठिकाणी नाव कमावले त्याच उद्योगाला काही जण बदनाम करत आहेत, खाल्ल्या थाळीत घाण करण्याची ही वृत्ती आहे, अशी टीका बच्चन यांनी केली होती.  जी मंडळी बॉलिवूडविषयी चूकीची भाषा वापरतात त्यांनी ती वापरू नये असे आवाहन जया बच्चन यांनी केले होते. त्यांच्या या भाषणाला कंगनाने ट्वीट करुन उत्तर दिले आहे. 

बॉलीवूडचा अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्‍न उपस्थित केले गेले. गेले दोन महिने याच मुद्यावरून बॉलीवूडचे विश्व ढवळून निघाले आहे. आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच कंगन राणावत सारखी अभिनेत्री वारंवार आरोप करत आहे. बॉलिवूडमधील घराणेशाहीमुळे सुशांतने आत्महत्या केली असा आरोप करतानाच निर्माते करण जोहरसह खान कंपनीलाही तिने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. इतकेच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आणि अभिनेते मादकद्रव्याच्या आहारी गेले आहेत त्यामुळे त्यांची चौकशी करावी अशीही मागणी तिने केली आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख