सुप्रिया सुळे यांना प्राईम पॉईंट फौंडेशनचा संसद महारत्न पुरस्कार 

चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शनिवारी (ता.20) प्रदान करण्यात येणार आहे.
Best MP Award Annouced to NCP MP Supriya Sule
Best MP Award Annouced to NCP MP Supriya Sule

बारामती :  चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि इ- मॅगॅझीनतर्फे देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शनिवारी (ता.20) प्रदान करण्यात येणार आहे. (Best MP Award Announced to NCP Leader Supriya Sule)

मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा,  केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

संसद महारत्न पुरस्काराबरोबरच  सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विद्यमान सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती आणि चर्चेतील सहभागासाठी सलग सहाव्यांदा जाहीर झालेला संसदरत्न पुरस्कारही याच कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. (Best MP Award Announced to NCP Leader Supriya Sule)

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आल्याचे फाऊंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी कळविले आहे. गत सोळाव्या लोकसभेत सुळे यांनी सभागृहात 96 टक्के उपस्थिती लावत 152 चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण 1186 प्रश्न उपस्थित केले, तर 22 खासगी विधेयके मांडली. यासाठी त्यांना फाऊंडेशनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 
याबरोबरच चालू सतराव्या लोकसभेतही सुळे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम असून त्यांनी 89 टक्के उपस्थिती लावत 122 चर्चासत्रात भाग घेतला आहे. सभागृहात एकूण 286 प्रश्न त्यांनी विचारले असून चार खासगी विधेयके मांडली आहेत. या कामगिरीसाठी त्यांना पुन्हा एकदा म्हणजे सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com