जि. प.सदस्या सिमंतिनी कोकाटे करणार नोंदणी विवाह!

शहा (ता. सिन्नर) गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतीनी कोकाटे येत्या १ जुलैला नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. आपले सहकारी व बांधकाम व्यवसायिक राजेंद्र वानखेडे यांचे चिरंजीव सिद्धार्थ यांच्या विवाहबद्ध होत आहेत.
Simantini kokate
Simantini kokate

नाशिक : शहा (ता. सिन्नर) गटाच्या जिल्हा परिषद सदस्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतीनी कोकाटे (Z. P. Member Simantini kokate will tie her knot) येत्या १ जुलैला नोंदणी पद्धतीने विवाहबद्ध होणार आहेत. (on 1st jully she will do registered marrige) बांधकाम व्यवसायिक राजेंद्र वानखेडे यांचे चिरंजीव व आपले सहकारी सिद्धार्थ (Siddharth Wankhede) यांच्याशी विवाहबद्ध होत आहेत. 

जिल्हा परिषद सदस्य असताना विवाहबद्ध होणाऱ्या त्या तिसऱ्या सदस्या आहेत. यापूर्वी जिल्हा परिषद उपाध्यक्षा नयना गावित, महिला व बालकल्याण सभापती अश्वीनी आहेर यांचा विवाह झाला आहे. सिमंतीनी यांच्या विवाहासंदर्भात आमदार कोकाटे यांनी आपल्या लेटरहेडवर कोरोना परिस्थिती लक्षात घेता शासनाच्या नियमानुसार पन्नास सदस्यांच्या उपस्थितीत त्या विवाहबद्ध होत आहे. त्यासाठी ते कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने विवाह करतील. आपल्याला तालुक्यातील १५१ मुलींचे लग्न आपल्या कन्येच्या विवाहात करण्याची इच्छा होती. मात्र सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमुळे हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी म्हटेल आहे. हा विवाह सिन्नर मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला आहे. 

आमदार कोकाटे यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. ते म्हणतात, माझ्या परिवारातील आजपर्यंत साध्या पध्दतीच्या विवाहाची परंपरा पुढे चालू ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आहे. लग्न कार्य, त्यात होणारा अनाठायी खर्च व तत्सम सामाजिक चालीरीतीवर मी सातत्याने केलेले भाष्य, त्याला वास्तवात न्याय देण्याची वेळ आज माझ्यावर आलेली आहे.

ते म्हणाले, 'सिमंतीनी' ही माझी कन्या माझ्या पावलावर पाऊल ठेवून राजकारणात आली. जनतेनेही ती आपलीच 'लेक' समजून तिला प्रेम, माया दिली. त्या शिदोरीवरच ती जिल्हा परिषदेत निवडून आली. आता ती विवाहबंधनात अडकत असतांना माझे मन मात्र जनतेच्या प्रेमात अडकले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर  शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार केवळ पन्नास लोकांमध्ये हा विवाह सोहळा करणे माझ्यासाठी तरी शक्य नाही. 
...

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com