नगरसेविका संगीता जाधव जेंव्हा धामण सापाशी खेळतात...  - When corporator sangita jadhav play with snakes, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

चिपळूणमध्ये : पुराचे पाणी अपरांत हाँस्पिटलमध्ये शिरले त्यामुळे वीज पुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावले.
महाड तालुक्यातील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली | दरडीत घरांचे मोठे नुकसान | 72 लोक बेपत्ता झाल्याचा अंदाज| पोलिसांचे पथक घटना स्थळाकडे रवाना

नगरसेविका संगीता जाधव जेंव्हा धामण सापाशी खेळतात... 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 12 जुलै 2021

साप हा बहुतांश नागरिकांच्या दृष्टीने भितीचा विषय असतो. सापाची भिती घालविण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात. असाच एक प्रयोग काल येथील नगरसेविका संगीता जाधव यांनीही केला. त्यांनी सापाची भिती घालविण्यासाठी परिसरात पकडलेली धामण हाता घेऊन नागरिकांना त्याबाबत माहिती दिली. 

इंदिरानगर : साप हा बहुतांश नागरिकांच्या दृष्टीने भितीचा विषय असतो. (People always keep distance and fear about Snake) सापाची भिती घालविण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात. (Various experiment done to reduce this fear) असाच एक प्रयोग काल येथील नगरसेविका संगीता जाधव (Sangita Jadhav) यांनीही केला. त्यांनी सापाची भिती घालविण्यासाठी परिसरात पकडलेली धामण हाता घेऊन नागरिकांना त्याबाबत माहिती दिली. 

प्रसंग असा घडला की, रविवारी चेतना नगर येथे नागरिकांना दोन आठ ते दहा फूट लांबीच्या धामण जातीच्या सापांचे झालेले दर्शन घडले. या धामणची जोडी झाडांच्या अडोसा घेऊन लपल्या होत्या. मात्र महिलांच्या नजरेस पडल्यावर मुले व महिलांनी एकच गोंगाट केला. 

दाट वस्तीच्या सोसायटीत साप दिसल्याने तो चर्चेचा विषय तर ठरला. मात्र त्यापेक्षाही जास्त नगरसेविका संगीता जाधव यांनी ही धामण लीलया हाताळताना बघून नागरिक देखील आश्चर्यचकित झाले. 

सायंकाळी पाचच्या सुमारास नाशिक महापालिकेतील शिवसेनेच्या नगरसेविका जाधव यांच्या बंगल्यात आणि समोर असलेल्या सारथी सोसायटीच्या प्रांगणात आसपास खेळणाऱ्या मुलांना धामण दिसल्या या महाकाय धामण बघून मुलांनी आणि महिलांनी आरडाओरड सुरू केला. झाडांच्या फांद्यांमध्ये असलेल्या सापांच्या जवळ कुणी जाण्याचा प्रश्नच नव्हता. कुणी दूरवरून तर कुणी इमारतीच्या वरच्या मजल्याच्या खिडकीतून मोबाईल द्वारे चित्रीकरण करत होते. 

ss="rtejustify">दरम्यान स्थानिक नागरिकांनी आणि नगरसेविका जाधव यांनी सर्पमित्र शामराव यांना ही माहिती दिली. ते आले आणि त्यांनी या दोन्ही सापांना पकडले.  त्यानंतर सौ जाधव यांनी त्यापैकी एक धामण आपल्या हातात घेत निष्णात सर्प मित्र ज्या प्रमाणे सापाला पकडून त्याला सुरक्षित रित्या जेरबंद करण्यासाठी जी कृती करतात ती सर्व कृती करून सर्वांना चकित केले.  या प्रजातीबाबत सर्पमित्र शामराव यांनी नागरिकांना इत्यंभूत माहिती दिली. त्यानंतर या सापांना त्यांनी जेरबंद करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी  आपल्या सोबत नेले.
...

हेही वाचा...

शिवसेनेचे एकहाती सत्तेचे ध्येय पूर्ण करूच

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख