वाजपेयी असते तर, या भाजप आमदारांना घरी पाठवले असते!

दोन दिवसांपूर्वी भाजपच्या आमदारांनी विधानसभेत व सभापतींच्या दालनात गदारोळ केला. अतीशय गलीच्छ शिविगाळ व धक्काबुक्की केली. भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करीत आहेत. याची गंमत वाटते. आज माजी पंतप्रधाम अटलबिहारी वाजपेयी असते, तर आंदोलन नव्हे या आमदारांना घरचा रस्ता दाखवला असता, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी म्हटले आहे.
Prerana Balkawade,
Prerana Balkawade,

नाशिक : दोन दिवसांपूर्वी भाजपच्या आमदारांनी विधानसभेत व सभापतींच्या दालनात गदारोळ केला. (BJP 12 MLA misbehavior in Assembly) अतीशय गलीच्छ शिविगाळ व धक्काबुक्की केली. भाजपचे कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करीत आहेत.(BJP workers doing agitation in there support)  याची गंमत वाटते. आज माजी पंतप्रधाम अटलबिहारी वाजपेयी असते, तर आंदोलन नव्हे या आमदारांना घरचा रस्ता दाखवला असता, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे (Prerana Balkawade) यांनी म्हटले आहे. 

यासंदर्भात त्या `सरकारनामा`च्या प्रतिनिधीशी बोलत होत्या. त्यांनी या विषयावर एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्या म्हणाल्या, पार्टी वीथ डिफरन्स असा दावा करणाऱ्यांचा  पक्ष व त्याच्या नेत्यांचे वेगळेपण काय? हे सबंध महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्या वर्तणुकीतून लाईव्ह पाहिले. त्यांच्या नेत्यांनी विधानसभेत खजील होत ते घडल्याचे मान्य केले. विधानसभेत ते खजील झाले. मग ज्यांच्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम झाला त्यांचे राजीनामे का घेत नाहीत?.

त्या म्हणाले, विधान भवनात कामकाज सुरू असताना जनतेच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणे वेगळे व जनतेच्या प्रश्नांच्या नावाखाली आई बहिणींचा उल्लेख करीत शिवीगाळ करत बदनामी करणे ही महाराष्ट्राची संस्कृती तर नक्कीच नाही. महाराष्ट्राच्या संसदीय परंपरेला भाजपने काळीमा फासला आहे.

सभ्य, सुसंस्कृत व वैचारीक पक्ष असल्याचे आव हा पक्ष आणत असतो. पक्षातील आमदारांना हे असले कृत्य करणे शोभते का?. असल्या गुंड प्रवृत्तीच्या आमदारांना सुसंस्कृतपणाचे ढोंग करणारा भाजप आता कारवाई करायचे सोडुन त्यांना पाठीशी घालत आहे. खरच जर भाजपला जनतेचे  प्रश्न  व महाराष्ट्राच्या संस्कृतीचा मान असेल, तर या आमदारांना पक्षातुन निलंबीत करून त्यांचे रीजीनामे घेतले पाहीजेत. या पक्षाचा प्रवास कोणत्या दिशेने सुरु आहे. जनतेच्या मनातून ते उतरले आहेत. आज दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असते, तर त्यांनी काय केले असते. राजधर्म पाळण्याचा आग्रह धरणाऱ्या, सुसंस्ककृत नेते असलेल्या वाजपेयींनी नक्कीच या सगळ्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांची कानउघडणी केली असती. या आणदारांचे राजीनामे घेऊन त्यांना घरी पाठवले असते. 

महाजन नाशिकला येऊ नका !
त्या म्हणाल्या, नाशिकचे माजी  पालकमंत्री गिरिष महाजन व सध्याचे भाजपचे नाशिक जिल्हा प्रभारी  जयकुमार रावल हे देखील या कृत्यामध्ये सहभागी होते. आई बहिणींवरून शिवीगाळ करणाऱ्या या असल्या आमदारांना आमच्या नाशिकच्या माय भगीनी नाशिकमध्ये पाय ठेऊन देणार नाही. त्यांच्या या कृत्याला माफी नाही. त्यांनी नाशिकला पाय ठेऊ नये.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com