महिलांच्या उत्पादनांसाठी ‘स्मॉल मार्ट’ संकल्पना राबवू

माहिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाचं छताखाली देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून भवन उभारण्यात यावे, असे प्रतिपादन राज्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी केले.
Yashomati Thakur
Yashomati Thakur

नाशिक : महिला व बालविकास विभागाच्या (Womens and child welfare Department) अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच ठिकाणी आणली जातील. माहिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाचं छताखाली (All scheme at one roof) देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून भवन उभारण्यात यावे, असे प्रतिपादन राज्याचे महिला व बाल विकास मंत्री ॲड यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याचा कोरोना, सद्यस्थितीचा व महिला बाल विकास विभागाचा आढावा श्रीमती ठाकूर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी त्या  म्हणाल्या की, महिला व बाल विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यासारख्या विविध कार्यालयांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर या योजनांची अंमलबजावणी होते. ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्यास महिलांना योजनांचा लाभ घेणे अधिक सोयीस्कर होणार आहे. या भवनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ‘स्मॉल मार्ट’ ही संकल्पना राबवून बचतगटाच्या महिलांना आर्थिक प्रगती साधण्यासाठी मदत होईल. त्यामुळे जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास भवन उभारण्याची कार्यवाही गतीने करण्यात यावी.

महिला व बालकांविषयीच्या समित्याविषयी अधिक जागृकपणे काम करणे आवश्यक असून विशाखा समितीवर काम करणाऱ्या अध्यक्षांना समिती विषयक तांत्रिक बाबींची माहिती होण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. तसेच कोंटुबिक हिंसाचार, सायबर गुन्हे, महिला आयोगाच्या कार्यालयाचे कामकाज, बालगृह वन स्टॉप सेंटर वर लक्ष ठेवून कामकाज करण्याच्या सूचना यावेळी, ॲड ठाकूर यांनी दिल्या आहेत.
जिल्ह्यात कोरोना काळात जिल्हा परिषदेने राबविलेली ‘एक मूठ पोषण आहार’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून यामुळे उपक्रमामुळे बालकांचे कुपोषण कमी होण्यास नक्कीच मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली. तसेच शल्य चिकित्सक डॉ. थोरात यांनी कोरोना सद्यस्थितीबाबत सादरीकरण केले.  

यावेळी आमदार माणिकराव कोकाटे, हिरामण खोसकर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या सभापती अश्व‍िनी आहेर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न औषध प्रशासनाचे सह संचालक दुष्यंत भामरे, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे, महिला व बाल विकास अधिकारी दिपक चाटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते.
---
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com