शिवसेनेच्या पुढाकाराने नमाजसाठी तीन मजली इमारत !

मुस्लीम समाजाच्या नागरिकांना प्रार्थनेसाठी (नामज) शहरात पहिली तीन मजली इमारत उभारण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे यासाठी शिवसेनेच्या नेत्या सत्यभामा गाडेकर यांनी पुढाकार घेतला.
Satyabhama Gadeka
Satyabhama Gadeka

नाशिक रोड : मुस्लीम समाजाच्या नागरिकांना प्रार्थनेसाठी (नामज) शहरात पहिली तीन मजली इमारत उभारण्यास महापालिकेने मंजुरी दिली आहे. विशेष म्हणजे यासाठी शिवसेनेच्या नेत्या सत्यभामा गाडेकर यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे चाकोरीबाहेरचा हा उपक्रम चर्चेचा विषय ठरला आहे.  

नाशिकरोड परिसरात मुस्लिम बांधवांना नमाज पठणासाठी जागा अपुरी पडत होती. त्यासाठी त्यांनी विविध पर्याय म्हणून जागेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला यश येत नव्हते. यातील काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख व नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांच्याशी संपर्क केला. सौ गाडेकर यांनी या भागातील नागिरकांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी या नागिरकांशी चर्चा करुन इमारात बांधण्याचा प्रस्ताव मांडला. त्याला या नागरिकांनीही होकार दिला. त्यातूनच नमाजसाठी इमारत बांधण्याच्या विषयाला गती मिळाली.  

मुस्लिम नागिरकांच्या मागणीची दखल घेऊन नगरसेविका गाडेकर यांनी एक कोटी रुपयांच्या निधीतून इमारत उभारणीची मंजुरी मिळविली आहे. प्रभाग क्रमांक २२ मध्ये हा प्रकल्प होणार आहे. सौ. गाडेकर यांनी डिसेंबर २०२० मध्ये महापालिका प्रशासनाला पत्र देऊन नमाज पठणासाठी कब्रस्तान लगत तीन मजली इमारत उभारणीसाठी महापालिका अंदाजपत्रकात तरतूद करण्यासाठी पाठपुरावा केला. तत्कालीन आयुक्तांची भेट घेऊन या प्रकल्पासाठी आग्रह धरला. गाडेकर यांच्या मागणीची दखल घेत महापालिकेने एक कोटी रुपयांची अंदाजपत्रक तरतूद करून इमारतीला प्रशासकीय मंजुरी दिली. 

नगरसेविका गाडेकर यांनी कब्रस्तान आणि ईदगाह मैदानाची पाहणी केली असून, लवकरच या ठिकाणी नमाज पठणासाठी तीन मजली इमारत उभी राहणार आहे. या निर्णयामुळे मुस्लिम बांधवांनी समाधान व्यक्त केले. पहिल्यांदाच शहरात असा उफक्रम होत आहे. त्यामुळे या  प्रकल्पाचे अन्य शहरांत देखील त्याचे अनुकरण होऊ शकेल, नगरसेविका गाडेकर यांनी खऱ्या अर्थाने एक आगळे वेगळे सामाजिक काम केले आहे. त्यामुळे नमाज पठणाचे पावित्र्य जपले जाईल. यानिमित्ताने मुस्लिम बांधवांचे स्वप्न साकार झाले, असे ईदगाह कब्रस्तान कमिटीचे सेक्रेटरी शेख फझील आणि तेहसीन खान यांनी सांगितले. 
...
नागरी समस्यांचे निराकरण हा प्राधान्याचा विषय आहे. त्यादृष्टीने सर्वांच्या मागणीनुसार मी या उपक्रमासाठी प्रयत्न केले. तीन मजली इमारत बांधण्याचा हा उपक्रम शहराच्या दृष्टीने व समाजासाठी उपयुक्त ठरेल याचे समाधान आहे. - सत्यभामा गाडेकर, नगरसेविका, शिवसेना. 
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com