सलाम आजच्या हिरकणीला...९ दिवसांच्या लेकीसह पुष्पा बांबळे ग्रामपंचायत बैठकीत - Salute to mother....Pushpa Bambale attendmeeting with 9 days newly baby | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

सलाम आजच्या हिरकणीला...९ दिवसांच्या लेकीसह पुष्पा बांबळे ग्रामपंचायत बैठकीत

राम शिंदे
बुधवार, 30 जून 2021

सर्वतीर्थ टाकेद (ता. इगतपुरी)  येथील मायदरा-धानोशी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच सौ पुष्पा साहेबराव बांबळे आपल्या नऊ दिवसांच्या बाळासह ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीस उपस्थित राहिल्या. सध्या नाजुक-साजुक महिलांच्या युगात या मातेने गावगाडा हाकण्याचे आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी दाखवलेली हा कणखर बाणा पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरला.
 

 

 

नाशिक : सर्वतीर्थ टाकेद (ता. इगतपुरी)  येथील मायदरा-धानोशी ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच सौ पुष्पा साहेबराव बांबळे (Pushpa Bamble attend Grampanchayat Meeting with newly born baby of 9 days) आपल्या नऊ दिवसांच्या बाळासह ग्रामपंचायतच्या मासिक बैठकीस उपस्थित राहिल्या. सध्या नाजुक-साजुक महिलांच्या युगात या मातेने गावगाडा हाकण्याचे आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी दाखवलेली हा कणखर बाणा पंचक्रोशीत (People appriciate her for initiative) कौतुकाचा विषय ठरला.

मायदरा- धानोशी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ  बांबळे या एका मुलीला जन्म देऊन नऊ दिवसांपूर्वीच बाळंत झाल्या. मंगळवारी ग्रामपंचायतची मासिक बैठक होती. या बैठकीस सरपंच बांबळे यांनी आपल्या नऊ दिवसांच्या नवजात कन्येसह मुलीसह उपस्थिती दर्सवली. एव्हढेच नव्हे तर कामकाजात भाग घेऊन विविध सूचनाही केल्या. गावाच्या विकासाच्या दृष्टीने पाणी पुरवठा, वीजेचा प्रश्न, दलित वस्तीतील मंजूर पथदीप, विकास कामे, घरकुल योजने संदर्भात सविस्तर माहिती घेतली. गावातील शिवार रस्त्यांच्या प्रश्नासंदर्भात आढावा घेतला.

दरम्यान नऊ दिवसांच्या बाळासह सरपंच बांबळे बैठकीस उपस्थित राहून त्यांनी गावाच्या विकासाची कामांबाबत विविध सूचना केल्या. त्यांच्या या कणखरपणाचे कौतुक होत आहे. ग्रामसेवक नितीन हेंबाडे, उपसरपंच चंद्रभागा बहिरु केवारे, ग्रामपंचायत सदस्य लंकाबाई बांबळे, गंगाराम करवंदे आदींसह ग्रामस्थांनी सरपंच बांबळे यांचे स्वागत केले. त्यांचे अभिनंदन केले. 

...
"सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून मी जबाबदारीने जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यतत्पर राहीले आहे. तसे अश्वासन ग्रामस्थांना दिले होते. ते केवळ आश्वासन न राहता गावचा सर्वांगीण विकास साधण्याच्या दृष्टिकोनातून मी नऊ दिवसांच्या मुलीसह मिटींगला उपस्थित राहिले. ते मी माझे कर्तव्यच समजते"
- पुष्पा साहेबराव बांबळे , सरपंच मायदरा-धानोशी ग्रामपंचायत
...

हेही वाचा...

फडणवीसांनी राजकारण सन्यास घ्यावाच....

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख