नेत्यांच्या अवघड काळात पाठीशी उभ्या राहणाऱ्या कन्यांमध्ये आता रोहिणी खडसेंची गणना  

राजकारणात नेता असलेल्या पित्यावर संकट आल्यास तेवढयाच खंबीर पणे त्यांच्या पाठीशी त्यांच्या कन्या उभ्या राहिल्या आहेत.आम्ही मुलांपेक्षा कुठेही कमी नाही हे आता खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीही दाखवून दिले आहे
Rohini Khadse and Ekanath Khadse
Rohini Khadse and Ekanath Khadse

जळगाव : राजकारणात नेता असलेल्या पित्यावर संकट आल्यास तेवढयाच खंबीर पणे त्यांच्या पाठीशी त्यांच्या कन्या उभ्या राहिल्या आहेत.आम्ही मुलांपेक्षा कुठेही कमी नाही हे आता खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनीही दाखवून दिले आहे. 

राजकारणात नेत्यावर संकटे येत असतातच त्यावेळीं त्यांच्या पाठीशी कार्यकर्ते असतातच. परंतु, घरातील वक्तीही सोबत असल्यास एक मोठा आधार असतो. राज्यात नेत्यांच्या अवघड काळात त्यांच्या कन्या च खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या चे दिसून आले आहे.नुकत्याच विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राज्यात सरकार स्थापनेचा पेच निर्माण झाला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेचा अनेक बैठका झाल्यानंतर तीन पक्षाचे सरकार करण्याचे निश्चित झाले. दुसऱ्या दिवशी सर्व सुरळीत होणार असे चित्र असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी भाजपाला पाठिंबा देऊन सरकारचा शपथ विधीही केला.

त्यावेळी संपूर्ण देशाचे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याकडे होते. कारण सरकार स्थापनेसाठी तेच पुढाकार घेत होते आणि त्याचेच पुतणे अजित पवार पक्षातील काही आमदारांना घेऊन भाजपशी हात मिळवणी केली होती.त्यामुळे शरद पवार यांच्या साठी हा काळ अडचणीचा होता. मात्र, या काळात त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या, हे संपूर्ण देशाने पाहिले.आमदारांशी संपर्क सोबतच त्या सरकार स्थापन होवून विधिमंडळाच्या पहिल्या बैठकीसाठी त्या विधिमंडळाच्या प्रवेश द्वारावर आमदारांच्या स्वागतासाठी उपस्थित होत्या. वडिलांच्या पाठीशी उभे राहून यश मिळेपर्यंत खिंड त्यांनी लढविली.     

याच प्रमाणे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या सुध्दा संकट काळात मुंडे यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. भाजप मध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या वर अन्याझाला त्यावेळी त्यांनीही पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. या काळात पंकजा मुंडे त्यांच्या सोबत खंबीर होत्या. मात्र, त्यावेळी त्यांनी पक्ष सोडला नाही. त्यानंतर सर्व सुरळीत होवून पुढे मुंडे केंद्रीय मंत्री झाले. 

भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांना मंत्री मंडळातून राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर पुढच्या कठीण काळात त्यांच्या कन्या अॅ.रोहिणी खडसे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. अगदी पक्षाने खडसे यांची उमेदवारी रद्द करून त्यांना उमेदवारी दिली. त्यावेळीं त्या निवडणूक लढल्या त्यांचा पराभव झाला. त्यामुळे एकनाथ खडसे नाराज झाले. मात्र अॅड.रोहिणी खडसे खंबीर राहिल्या. वडिलांच्या पाठीशी ताकत कायम ठेवण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहिला. पक्षांतर करण्याच्या कठीण काळात महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या त्या जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमन आहेत.
Edied By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com