माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भाचेसून पराभूत

भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे जिल्हयातील बोदवड तालुक्यातील नाडगाव हे गाव आहे. या ठिकाणी त्यांच्या भाचेसून ईश्‍वरचिठ्ठीने पराभूत झाल्या आहेत. तर कॉंग्रेसच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून ७ पैकी केवळ एक उमेदवार विजयी झाला आहे.नाडगाव येथे गेल्यावेळी कॉंग्रेसची सत्ता होती.
Pratibha Patil
Pratibha Patil

जळगाव  : भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे जिल्हयातील बोदवड तालुक्यातील नाडगाव हे गाव आहे. या ठिकाणी त्यांच्या भाचेसून ईश्‍वरचिठ्ठीने पराभूत झाल्या आहेत. तर कॉंग्रेसच्या पॅनलचा धुव्वा उडाला असून ७ पैकी केवळ एक उमेदवार विजयी झाला आहे.नाडगाव येथे गेल्यावेळी कॉंग्रेसची सत्ता होती.

या ठिकाणी प्रतिभाताई पाटील यांचे भाचे कॉंग्रेसचे नेते नाडगाव येथील माजी पंचायत समिती सभापती  विरेंद्रसिंग पाटील यांच्या पत्नी सौ.रंजनाकौर विरेंद्रसिंग पाटील यांनी कॉंग्रेसच्या पॅनेलतर्फे उमेदवारी होती.त्यांच्या विरोधात अपक्ष योगिता श्रीकृष्ण लसूनकर यांची उमेदवारी होती. यात दोघी उमेदवारांना ३०२ अशी समसमान मते पडली, त्यानंतर ईश्‍वरचिठ्ठी काढण्यात आली. त्यात सौ.रंजनाकौर विरेंद्रसिंग पाटील  या पराभूत झाल्या. त्यांचा पराभव हा कॉंग्रेसला धक्का मानला जात आहे.

कॉंग्रेसचे पॅनलही पराभूत
नाडगाव ग्रामपंचायतीवर कॉंग्रेसचा झेंडा होता. मात्र या निवडणूकीत  कॉंग्रेसचा पूर्णपणे धुव्वा उडाला आहे. ग्रामंपचायतीत एकूण सात जागा आहेत, त्यापैकी सहा जागेवर विरोधी उमेदवार विजयी झाले आहेत. माधुरी गवळे या कॉंग्रेसच्या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत. विरोधी भाजप,शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या गावातील कॉंग्रेसची सत्ता खालसा झाली असून या ठिकाणी विरोधी भाजप-सेना पुरस्कृत उमेदवारांची सत्ता स्थापन होणार आहे. 
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com