नीलम गोऱ्हेंनी घेतली `मीडिया ट्रायल` वाल्यांची झाडाझडती!

मलंगगड येथे तोकडे कपडे घातल्याने तरुण-तरूणीला मारहाण करण्यात आल्याच्या प्रकरणाची राज्य शासन चौकशी करणार आहे. मात्र या संदर्भात संबंधीतांनी पोलिसांत तक्रार द्यायला हवी होती.
Neelam Gorhe
Neelam Gorhe

नाशिक : मलंगगड येथे तोकडे कपडे घातल्याने तरुण-तरूणीला मारहाण करण्यात आल्याच्या (Couple in short cloathes has been beaten by unknown) प्रकरणाची राज्य शासन चौकशी करणार आहे. (Government will initiate inquiry of it) मात्र या संदर्भात संबंधीतांनी पोलिसांत तक्रार द्यायला हवी होती. (Police should have register complain of it)  त्यांना मारहाण करणारे संस्कृती रक्षक होते की कोण? हे तपासातच स्पष्ट होईल, असे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Dr Neelam Gorhe) यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी इलेक्ट्रॅानिक्स माध्यमांकडून महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांचे होणारे रिपोर्टींग, बातम्या यासंदर्भात माध्यमांचे कान टोचले. त्या म्हणाल्या, यासंदर्भात वारंवार पोस्को कायद्याचे व न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन होताना दिसते. अत्याचार झालेल्यांचे घर, कुटुंबीय सर्व इलेक्ट्रॅानिक्स माध्यमांत दाखवले जातात. कोपर्डीच्या घटनेत तर अगदी छायाचित्र देखील प्रसिद्ध करण्यात आले. ते देखील दुसऱ्याच मुलीचे चित्र होते. अशा प्रकारे माध्यमांनी वार्तांकन करणे योग्य नाही. अनेक प्रकरणांत तर आपण सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश असल्याच्या अविर्भावात मीडिया ट्रायल केली जाते, हे कितपत योग्य आहे?असा प्रश्न त्यांनी केला.  
मलंगगड येथील प्रकरणाबाबत स्थानिक मंत्री एकनाथ शिंदेशी मी बोलले आहे. ते देखील या प्रकरणात लक्ष घालतील. राज्य शासनाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. संबंधित अधिकारी श्री. मोहिते यांच्याकडून मी माहिती घेतली आहे. ते जोडपे मेडिकलसाठी का गेले नाही. त्यांना रुग्णालयात घेऊन जाणारे अधिकारी पिडीत महिलेची वैद्यकीय तपासणी न करताच कसे परत आले. या सगळ्यांचा खुलासा तपासात होईल. 

त्या पुढे म्हणाले, या जोडप्याला माराहण करणारे कोण?. त्यांचा हेतू काय?. कोणाशी संबंधीत संस्कृती रक्षक होते याचा तपास होईल. अनेकदा या संस्कृती रक्षकांचा हेतू चांगला असतो, मात्र काही लोक अशा घटनांत पिडीतेचा गैरफायदा घेतात. तोकडे कपडे घातले म्हणून मारहाण केली हे कोणाचे समर्थक आहेत का? याची चौकशी समिती नेमावी का हे सरकारने ठरवावे. त्या भागात सीसीटीव्ही नाहीत. त्याची व्यव्सथा करण्यासाठी मंत्री एकनाथ शिंदेंना कळविले आहे. आरोपींना लवकर पकडावं यासाठी पोलिस पाठपुरावा करीत आहेत. 

पत्रकारांचे टोचले कान? 
संबंधीतांनी आपली व्यथा सोशल मिडियावर मांडली हे चांगलेच झाले. मात्र त्यांनी त्याबाबत ईमेल द्वारे देखील पोलिसांना कळवता आले असते. त्याचे रुपांतर तक्रारीत होते. पोलिस महासंचालकांना मेल करायला हवा होता, तो मेल दखलपात्र तक्रार झाली असती. आता पोलिसांनी ट्विटरवरील पोस्टची दखल घेत तक्रार दाखल केली आहे.

शिक्षा झाल्याची बातमी येत नाही
माध्यमांनी पोलिसांचे खच्चीकरण होईल असे वार्ताकण करू नये. पोलिसांचे नितीधैर्य खच्ची होईल असे वार्तांकन करू नये. प्रत्येक गोष्टीचे भांडवल करू नये आणि मीडिया ट्रायल थांबवावी. एखाद्या प्रकरणाची बातमी केली जाते तशी त्या प्रकरणात शिक्षा झाल्याची बातमी येत नाही.  एखादी घटना सनसनाटी असते म्हणून बातमी होते.
...
 हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com