मोदीजी, महाराष्ट्राला कोरोना लस केव्हा देणार? - NCP Womens deemand Covid19 vaccin for maharashtra. NCP Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

पूजा चव्हाण मृत्यप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

मोदीजी, महाराष्ट्राला कोरोना लस केव्हा देणार?

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार पुन्हा होऊ लागला आहे. तो नियंत्रणात आणन्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. मात्र कोरोना योद्धे आणि समाजातील प्रत्येक घटकाला लस मिळाली पाहिजे.

नाशिक : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार पुन्हा होऊ लागला आहे. तो नियंत्रणात आणन्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. मात्र कोरोना योद्धे आणि समाजातील प्रत्येक घटकाला लस मिळाली पाहिजे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने राज्य शासनाच्या मागणीनुसार कोव्हीड19 लस द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेस नासिक शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी केली आहे. 

यासंदर्भात आज पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेतली. त्यांना निवेदन दिले. समाजातील प्रत्येक घटकातील नागरिकांना कोरोना रोगावरील प्रतिबंधक लस लवकरात लवकर देण्याची गरज आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिल्हाधिकारी मांढरे यांच्यामार्फत लोकसभेतील गटनेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा भामरे यांच्या नेतृत्वाखाली आज देण्यात आले. 

त्या म्हणाल्या, जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. अशा कठीण परिस्थितीत आता पुन्हा एकदा कोरोनाच्या संकटाने महाराष्ट्रात प्रसाराला सुरूवात झालेली दिसते आहे. या संकटाला सर्वस्वी नागरिक जबाबदार आहेत हे प्रथम दर्शनी दिसून येते. मात्र नागरिकांना  वा-यावर सोडुन चालणार नाही हे कटू सत्य आहे. आता तर कोरोनाची दुसरी लाट येते की काय? अशी शंका सर्व सामान्य जनतेला वाटू लागली यामुळे नागरिक भयभीत आहेत.

देशभरात कोरोना रोगावरील प्रतिबंधक कोव्हॅव्सिन आणि कोविशिल्ड लस देण्यात येत आहे. सुरुवातीला कोरोना योध्यांना लस देण्याचे सरकारच्या वतीने निश्चित करण्यात आले आहे. मात्र अशा संकटातही अनेक कोरोना योध्यांनी अद्याप लस घेतलेली दिसत नाही. कोरोना योध्यांसोबतच प्रत्येक घटकातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस लवकरात लवकर देण्यात यावी. त्यामुळे कोरोना संकटातून सामान्य जनता मुक्त होईल. शासकीय स्तरावर  ही  मागणी पंतप्रधान मोदी यांना त्वरित कळवावी अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे करण्यात आली. 

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या विभागीय अध्यक्षा संगिता गांगुर्डे, सरिता पगारे, सलमा शेख, स्मिता चौधरी आदि पदाधिकारी उपस्थित होत्या.
...
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख