जळगावच्या महापौर भारती सोनवणे कोविड सेंटरमध्ये करतात भोजन

जळगावच्यामहापौरांनी केवळ महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर अवंलबून न राहता सुविधांबाबत थेट रूग्णांशीच संवाद सुरू केला आहे. कोविड सेंटर व क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या रूग्णाला दररोज फोन करून त्या त्यांची विचारपूस करतात व सुविधाबाबत त्यांच्याकडून माहितीही घेतात
Jalgaon Mayor Testing Food Quality at Covid Centre
Jalgaon Mayor Testing Food Quality at Covid Centre

जळगाव: ‘ताई कोविड सेंटरमध्ये आम्हाला जेवण व्यवस्थित मिळत नाही, अशी भ्रमणध्वनीवरून महापालिकेच्या कोविड सेंटरमधील रूग्णची तक्रार प्राप्त झाली.अन महापौर भारती सोनवणे व त्यांचे पती नगरसेवक कैलास सोनवणे यांनी थेट कोविड सेंटरमध्ये जावून भोजनाची चव घेतली केवळ एक दिवस नव्हे तर जेवणाच्या व नाश्‍ताच्या वेळी अचानक जावून ते स्वत: चव घेवून बघत आहेत. शिवाय दररोज मोबाईलवर प्रत्येक रूग्णांशी चर्चा करीत आहेत.

जळगाव महापालिकेतर्फे शासकीय तंत्र निकेतन व आय.टी.आय.च्या वसतीगृहात कोविड सेंटर तसेच क्वारंटाईन सेंटर करण्यात आले आहे. या ठिकाणी असलेल्या रूग्णांच्या सुविधाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी होत्या. त्यावेळी महापौर भारती सोनवणे व नगरसेवक कैलास सोनवणे यांनी स्वत:त्या तक्रारी निवारण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश दिले. मात्र शासकीय स्तरावरचे काम कठीण असते. अधिकारी केवळ काम केल्याचे सांगतात. परंतु, प्रत्यक्षात तक्रारी कायम असतात. 

त्यामुळे महापौरांनी केवळ महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर अवंलबून न राहता सुविधांबाबत थेट रूग्णांशीच संवाद सुरू केला आहे. कोविड सेंटर व क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या रूग्णाला दररोज फोन करून त्या त्यांची विचारपूस करतात व सुविधाबाबत त्यांच्याकडून माहितीही घेतात.

कोविड सेंटरमध्ये जेवण
'कोविड' सेंटरमधील नाश्‍ता व जेवणाबाबत रूग्णांनी महापौर सोनवणे यांच्याकडे मोबाईलवरुन तक्रार केली. त्यावेळी त्या व त्यांचे पती कैलास सोनवणे तातडीने कोविड सेंटरमध्ये गेले. त्यांनी त्या ठिकाणचे जेवण मागवून स्वत: जेवण केले. तेथील स्वयंपाक करणाऱ्या ताबडतोब सूचनाही दिल्या. एवढेच नव्हे तर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्‍त्याच्या वेळेस जावून त्यांनी स्वत: नाश्‍ता केला. त्यानंतर त्या अचानक जेवणाच्या वेळी जावून त्या पाहणीही करीत आहेत. या शिवाय या ठिकाणी रूणांवर होणारे उपचार, त्यांना देण्यात येणारी औषधी, याबाबतही त्या माहिती घेत असतात. महापौरच स्वत: पाहणी करीत असल्यामुळे या ठिकाणी असुविधाबाबतच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. 

Edited By - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com