नस्तनपूरच्या विकासासाठी भारती पवार घेणार पुढाकार 

तालुक्यातील श्रीक्षेत्र नस्तनपूर येथे शिर्डीच्या धर्तीवर विकसित होत असलेल्या शनिमंदिर या तीर्थस्थळासाठी केंद्र सरकारतर्फे २५ कोटींचा निधी उपलब्ध व्हावा, पर्यटन विभागाकडून ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळावा, या मागणीसाठी आपण निश्चित पाठपुरावा करू, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिले.
Bharti- Pawar Anil
Bharti- Pawar Anil

नाशिक : नांदगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र नस्तनपूर येथे शिर्डीच्या धर्तीवर विकसित होत असलेल्या शनिमंदिर या (Nastanpur will devolopment will be on Shirdi paturn) तीर्थस्थळासाठी केंद्र सरकारतर्फे २५ कोटींचा निधी उपलब्ध व्हावा, (25 cr. fund shall avail from centre Government) पर्यटन विभागाकडून ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळावा, (Nasanpur shall get b grade shrine) या मागणीसाठी आपण निश्चित पाठपुरावा करू, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar)यांनी दिले. नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा दर्जा देण्याबाबत लवकरच नाशिकला बैठक घेण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

मंत्री डॉ. पवार यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल श्रीक्षेत्र नस्तनपूरच्या देवस्थानचे  प्रमुख विश्वस्त, माजी आमदार ॲड. अनिल आहेर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी दिल्लीतील आरोग्य राज्यमंत्र्यांच्या दालनात भेट घेत त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.

पंचवीस कोटींचा निधी द्यावा
ॲड. आहेर यांनी नस्तनपूर येथे देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून सध्या सुरू असलेल्या कामांची माहिती डॉ. पवार यांना दिली. श्रीक्षेत्र नस्तनपूर संस्थानने विकासकामांच्या दृष्टीने १५ एकर जागा खरेदी केली आहे. या जागेला तीर्थस्थानाच्या विविध विकास योजनांसाठी २५ कोटींचा निधी मिळाल्यास भाविकांच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या अद्ययावत व प्रशस्त सुख-सुविधा या जागेत उपलब्ध करून देता येतील. यामुळे नांदगावसारख्या दुर्गम भागाच्या विकासालाही चालना मिळून भाविकांना तीर्थ व पर्यटनाचा मोठा लाभ मिळेल, याकडे लक्ष वेधले.

‘ब’ वर्गाचा प्रस्ताव मंजूर व्हावा
श्रीक्षेत्र नस्तनपूर येथील श्री शनिमहाराज मंदिर संस्थानने ‘ब’ वर्गाचा दर्जा प्राप्त व्हावा या दृष्टीने सर्व बाबींच्या पूर्ततेसह महाराष्ट्र शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे. परंतु वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामीण विकास मंत्रालयाकडून ‘ब’ वर्गाचा प्रस्ताव मंजूर होत नसल्याने संस्थांनवर मोठा अन्याय होत आहे. आपण संस्थानला न्याय मिळवून देण्याकामी व प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आरोग्य राज्यमंत्री डॉ. पवार यांच्याकडे केली.

चर्चेदरम्यान व्यापारी संघटनेचे सरचिटणीस विजय चोपडा यांनीही नांदगाव स्थानकावर प्रवासी गाड्यांच्या थांब्याबाबत स्वतंत्र निवेदन दिले. नस्तनपूर येथे लोहमार्गावर रेल्वेकडून स्वतंत्र फलाट व्हावेत, यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सागर साळुंके, पुंडलिक सदगीर आदी उपस्थित होते.
...
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com