भारती पवारांमुळे नाशिकला पहिल्यांदाच दिल्लीत मानाचे पान!

`हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धाऊ गेला` राजकारणातील ही बहुचर्चीत म्हण संरक्षण मंत्री (कै) यशवंतराव चव्हाणांमुळे नाशिकशी संबंधीत आहे. मात्र थेट नाशिकला आजवर केंद्रात मंत्रीपद मिळालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात दिंडोरीच्या डॅा भारती पवार यांना संधी मिळाल्यानेते नाशिकला दिल्लीत पहिले मानाचे पान ठरले.
Dr Bharti Pawar
Dr Bharti Pawar

नाशिक : `हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धाऊ गेला` राजकारणातील ही बहुचर्चीत म्हण संरक्षण मंत्री (कै) यशवंतराव चव्हाणांमुळे (Y. B. Chavan became Unopposed M.P From nashik) नाशिकशी संबंधीत आहे. मात्र थेट नाशिकला आजवर केंद्रात मंत्रीपद मिळालेले नाही. (Nashik didn`t get portfolio in center ever) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात दिंडोरीच्या डॅा भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांना संधी मिळाल्याने ते नाशिकला दिल्लीत पहिले मानाचे पान ठरले..

पंतप्रधान मोदी यांनी सात मंत्र्यांचे राजीनामा घेत मंत्रीमंडळाचा मेगा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना व अन्य कारणांमुळे नरेंद्र मोदी यांची घसरत चाललेली लोकप्रियता, यांसह आगामी मुंबई महापालिका निवडणुका व राज्यातील महाविकास आघाडीच्या वारूला रोखण्यासाठी नव्या दमाची टीम म्हणून त्याकडे पाहिले जाते. यामध्ये दिंडोरी (नाशिक) मतदारसंघातून पहिल्यांदाच लोकसभेवर निवडून गेलेल्या डॅा पवार यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना आज तातडीने दिल्लीला बोलावून घेतले आहे. त्यामुळे त्यांना शपथविधीसाठी बोलावल्याने डॅा. पवार समर्थकांत त्यामुळे उत्साहाचे वातावरण आहे. 

नाशिक जिल्ह्यातील नेत्याला केंद्रात मंत्री म्हणून अद्याप संधी मिळालेली नाही. नाशिकहून गो. ह. देशपांडे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सुरवातीच्या काळातील खासदार होते. १९६२ मध्ये भारत- चीन युद्धानंतर पंतप्रधान पंडीत नेहरू यांनी यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलावून घेऊन संरक्षणमंत्री केले. तेव्हा झालेल्या पोटनिवडणूकीत परस्पर सहमतीने श्री. चव्हाण नाशिक मतदारसंघातून बिनविरोध निवडून गेले. त्यासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी निवडणूकीतून माघार  घेतली. त्याची परतफेड म्हणून नाशिकला ओझर येथे एचएएल प्रकल्प श्री. चव्हाण यांच्या प्रयत्नाने झाला. 

त्यानंतर आण्णासाहेब कवडे, विठ्ठलराव हांडे, प्रतापराव वाघ, मुरलीधर माने, डॅा. वसंतराव पवार हे सर्व काँग्रेसचे, माधवराव पाटील, देवीदास पिंगळे, समीर भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, भाजपचे डॅा. डी. एस. आहेर, शिवसेनेचे राजाभाऊ गोडसे, अॅड उत्तमराव ढिकले, हेमंत गोडसे खासदार झाले. दिंडोरीतून काँग्रेसचे झ़ेड. एम कहांडोळे, जनता दलाचे हरिभाऊ महाले, भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण व सध्याच्या डॅा भारती पवार यांनी प्रतिनिधीत्व केले. याशिवाय सुरगाणा संस्थानचे महाराज धैर्यशीलराव पवार सलग पंचवीस वर्षे राज्यसभेवर होते. देवळालीचे बाळासाहेब देशमुख हे देखील राज्यसभा सदस्य होते. यातील बहुतांश नेते समाजात मोठा प्रभाव असलेले होते. मात्र केंद्रीय मंत्रीपदावर त्यांची वर्णी झाली नव्हती. आजच्या विस्तारात डॅा पवार यांना संधी मिळाल्यास त्या नाशिकच्या पहिल्या केंद्रीय मंत्री ठरल्या आहेत.  

आक्रमक भारती पवार
डॅा. भारती पवार या मळच्या कळवण या आदिवासी तालुक्यातील आहेत. त्यांचे माहेर व सासर दोन्ही नाशिकचे. कळवण तालुक्यातील. त्यांचे सासरे ए. टी. पावर हे अत्यंत लोकप्रिय व विकासकामांमुळे परिचीत झालेले नेते होते. ते कळवण या मतदारसंघातून सलग पाच वेळा विधानसभेत गेले. त्यांना दोन वेळा राज्यमंत्री पद मिळाले. त्यांचा वारसा म्हणून डॅा. भारती पवार सलग दोन वेळा उमराणे व मानूर गटातून  जिल्हा परिषद सदस्य झाल्या.

कुपोषणावर अभ्यास

डॅा. भारती पवार यांचा कुपोषणावर अभ्यास आहे. त्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला. त्यांनी पुण्याच्या भारती विद्यापीठातून वैद्यकीय शाखेची पदवी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या त्या सक्रीय व आक्रमक पदाधिकारी राहिल्या आहेत. २०१४ मध्ये त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेची उमेदवारी दिली. त्यात त्यांचा परावभव झाला. २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार धनराज महाले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेल्या पवार यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत उमेदवारी मिळवली. त्यात निवडून आल्या. त्यांचे पती प्रवीण पवार हे अभियंता आहेत. 
...  

हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com