जिल्हा परिषद संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. आत्माराम कुंभार्डे - Dr Atmaram Kumbharde elcted president od ZP Asso., Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

 जिल्हा परिषद संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. आत्माराम कुंभार्डे

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 जुलै 2021

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. आत्माराम कुंभार्डे, तर कार्याध्यक्षपदी सभापती संजय बनकर यांची निवड करण्यात आली. गुरुवारी झालेल्या विभागीय बैठकीत नाशिक जिल्हा कार्यकारिणीची घोषणा महिला प्रदेशाध्यक्षा अमृता पवार यांनी केली.

नाशिक : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. आत्माराम कुंभार्डे, (Dr Atmaram Kumbharde elected as Z.P. & Panchayat samiti Association1s Nashik District president) तर कार्याध्यक्षपदी सभापती संजय बनकर (Sanjay Bankar is Executive president) यांची निवड करण्यात आली. गुरुवारी झालेल्या विभागीय बैठकीत नाशिक जिल्हा कार्यकारिणीची घोषणा महिला प्रदेशाध्यक्षा अमृता पवार (State President Amruta Pawar declaired the names) यांनी केली. 

अन्य पादधिकाऱ्यांत उपाध्यक्षपदी सिद्धार्थ वनारसे, समाधान हिरे, कावजी ठाकरे, उदय जाधव, सुरेश कमानकर, तर संघटकपदी महेंद्र काले, सरचिटणीसपदी दीपक शिरसाठ, प्रसिद्धीप्रमुखपदी यशवंत शिरसाठ यांचीही निवड झाली. 

बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आजी-माजी सर्व सदस्यांना असोसिएशनशी जोडून सभासद करण्याचा निर्णय झाला. प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास गोरे-पाटील अध्यक्षस्थानी होते. महिला प्रदेशाध्यक्षा अमृता पवार, कोकणचे अध्यक्ष सुभाष घरत, राज्य संघटक दिनकर पाटील, प्रदेश पदाधिकारी नीलिमा पाटील, गोरख बोडके, रूपांजली माळेकर, विनायक माळेकर उपस्थित होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या अधिकारासह विविध विषयांबाबत केंद्रीय पंचायत राज्यमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा निर्णय बैठकीत झाला. 

नयना गावित महिला अध्यक्षा
संघटनेच्या महिला विभागाचे पदाधिकारी असे, जिल्हाध्यक्षा- नयना गावित, कार्याध्यक्षा- सभापती अश्‍विनी आहेर, उपाध्यक्षा- सीमंतिनी कोकाटे, सुनीता चारोस्कर, सविता पवार, पुष्पा धाकराव, कविता धाकराव. तालुकाध्यक्ष- प्रवीण गायकवाड (येवला), शिवा सुरासे (निफाड), रमेस बोरसे (नांदगाव), अरुण पाटील (मालेगाव), नितीन आहेर (चांदवड), साधना गवळी (बागलाण), गीताजंली पवार-गोळे (कळवण), एन. डी. गावित (सुरगाणा), भास्कर गावित (पेठ), भास्कर भगरे (दिंडोरी), मोतीराम दिवे (त्र्यंबकेश्वर), रत्नाकर चुंभळे (नाशिक), हरिदास लोहकरे (इगतपुरी), वैशाली खुळे (सिन्नर), नूतन आहेर (देवळा). अभिजित साबळे यांनी सूत्रसंचालन केले.
...
हेही वाचा...

आमदार मौलाना मुफ्तींची स्थिती `नाचता येईना अंगण वाकडे`

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख