Bharti Pawar
Bharti Pawar

शेतीची वीज तोडण्याची मनमानी थांबवा

वीज वितरण कंपनीने शेतक-यांना मनमानी बीले आकारील आहेत. आधी त्याचे स्पष्टीकरण कंपनीने केले पाहिजे. त्यानंतर थकित वीज बिले असणारे शेतकरी नक्कीच सहकार्य करतील.

नाशिक : वीज वितरण कंपनीने शेतक-यांना मनमानी बीले आकारील आहेत. आधी त्याचे स्पष्टीकरण कंपनीने केले पाहिजे. त्यानंतर थकित वीज बिले असणारे शेतकरी नक्कीच सहकार्य करतील. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करु नका असे आवाहन खासदार डॉ. भारती पवार यांनी केले आहे.

त्या म्हणाल्या की, शेतकरी, सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांमुळे प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे.  वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे सक्तीचे वीजबिले आकारण्यात येत आहेत. ज्यांचे वीजबिल थकीत आहे अशा शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शनच खंडीत केले जात आहे. त्यामुळे शेतातील पिकांना विजेअभावी पाणी कसे द्यायचे असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. त्यांची पीके नष्ट होतील. त्यामुळे असंतोष पसरले. याचाही कारवाई करताना विचार करावा. शेतकऱ्यांना विजबिलात सवलत देऊन त्यांना हप्ते करून बिले भरण्याची सवलत राज्य सरकारने द्यावी.

शेतकरी, व्यापारी, नागरिकांना वाढीव बिले कमी करून त्यांना योग्य बिले द्यावीत. शेतकरी हताश निराश झाले आहेत. या संकटकाळात राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे अपेक्षित आहे. त्यांच्याशी असहकार्याची भुमिका घेऊन त्यांना अधिकच्या संकटात ढकलू नका, अशा विविध मुद्यांवर वीज महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार डॉ पवार यांनी सांगितले. 

शेतकऱ्यांना मदत करता येत नसेल तर त्यांच्या अडचणीमध्ये वाढ तर करू नका. कोरोना संकट काळातून शेतकरी सावरतोच नाही तर आस्मानी संकटाने शेतकऱ्यांना फटका दिला. आता राज्य सरकारने अधीकचा महसूल मिळावा म्हणून वीजबिल वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा लावला आहे. कृषी संजीवनी योजना ही थकीत बिले वसुली साठी नसून वीज पुरवठा चुकीच्या पद्धतीने खंडित केला जातोय, जनतेच्या वीज बिलाच्या माध्यमातून साडे नऊ हजार कोटींचा महसूल राज्याला मिळतोय कमीतकमी जी अवाजवी बिले आली आहे त्याची फेरतपासणी करून बिले पाठवावी. मध्य प्रदेश, गुजरात या राज्यांप्रमाणे लॉक डाऊनच्या बिलात सवलत देण्यात यावी .विजेच्या तारा ह्या खाली आल्याने अनेक ठिकाणी शॉट सर्किट होण्याचे प्रकार वाढले आहेत त्या कमीही लक्ष घालून त्या तारा वर ओढून होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल अशा विविध सूचना असेही खासदार डॉ.पवार यांनी केल्या.
...
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com