`मोदी साहेब, अच्छे नकोच, आमचे जुनेच दिवस परत द्या!`

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनचे गाजर दाखवून सामान्य जनतेला महागाईच्या संकटात लोटले. `अच्छे दिन`ची व्याख्याच त्यांनी बदलली. त्यामुळे तुमचे अच्छे दिन नकोच, आम्हाला आमचे जुने दिवस परत द्या, असे नाशिक शहर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा, नगरसेविका वत्सला खैरे यांनी म्हटले आहे.
Congress Agitation
Congress Agitation

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अच्छे दिनचे गाजर दाखवून सामान्य जनतेला महागाईच्या संकटात लोटले. (PM Modi push people in inflation crisis) `अच्छे दिन`ची व्याख्याच त्यांनी बदलली. त्यामुळे तुमचे अच्छे दिन नकोच, आम्हाला आमचे जुने दिवस परत द्या, (We want our old days back) असे नाशिक शहर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा, नगरसेविका वत्सला खैरे (Vatsala Khaire) यांनी म्हटले आहे.   

नाशिक शहर महिला काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पेट्रोल-डीझल, इंधनासह सर्व वस्तूंच्या दरांत केलेल्या प्रचंड दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. श्रीमती खैरे, माजी मंत्री शोभाताई बच्छाव, प्रदेश प्रवक्त्या, नगरसेविका डॅा हेमलता पाटील, आशा तडवी यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन झाले. 

यावेळी शहर अध्यक्षा खैरे  यांनी सांगितले की, केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल-डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेला सह इतर जीवनावश्यक वस्तूची महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. केंद्र सरकार काय योजना व धोरण राबविते, त्याचे काय परिणाम होतात, याची जाण त्यांना नाही. इंधनाचे दर वाढल्याने वाहतूकीसह अन्य सर्व वस्तूंच्या दरात अपरिहार्यपणे वाढ होते. त्याने महागाईला निमंत्रण मिळते. कोरोनामुळे लोकांकडे पैसे नाही व दुसरीकडे महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे.

अशा स्थितीत कोरोनामुळे सामान्य नागरिक, नोकऱ्या व रोजगार गमावलेले लोक यांसह महिलांना दिलासा देण्याची गरज आहे. मात्र असे कोणतेही धोरण व दिशा या सरकारकडे नाही. जनतेला आता त्यांचे अच्छे दिन नव्हे तर आमचे जुने दिवसच आम्हाला परत हवेत. या जीवघेण्या महागाईच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र सरकारच्या विरोधात अप्पर जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष शरद आहेर, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सचिव सुरेश मारू, वसंत ठाकूर, उध्दव पवार, चारुशीला शिरोडे, ज्युलि डिसुझा, वंदना पाटील, चारू काळे, अरुणा आहेर, समिना पठाण, डॅा. सुचेता बच्छाव, आशा मोहिते, सुलभा निकम, कुसूम चव्हाण, मनीषा मालूजकर, वनिता मुकणे, मंजुळा शेजवळ, जयश्री नगरे, मीना दिवाय, स्वाती जाधव, लक्ष्मण धोत्रे, संतोष हिवाळे, सचिन दीक्षित, प्रवीण काटे, आदिनाथ नागरगोजे, ज्ञानेश जंत्रे, सोमनाथ मोहिते, कल्पेश केदार व अण्णा मोरे आदी आंदोलनात सहभागी झाले. 
....
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com