इगतपूरी हुक्का पार्टीवरील छाप्यात `बिग बाॅस`ची अभिनेत्री ताब्यात?

इगतपुरी शहरालगत बॅालीवूडशी संबधित असलेल्या हाय प्रोफाईल हुक्का पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी बावीस जणांना ताब्यात घेतले आहे. स्काय व्हिला या दोन बंगल्यात ही पार्टी सुरु असल्याची माहीती मिळाल्यावरुन पोलिसांनी कारवाई केली. ताब्यात घेतलेल्यांची नावे अद्याप प्राप्त झालेली नाही. यामद्ये बिग बॅासमध्ये सहभागी झालेल्या महिलेचाही संबंध असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
Rev party IGT
Rev party IGT

नाशिक : इगतपुरी शहरालगत बॅालीवूडशी संबधित असलेल्या हाय प्रोफाईल हुक्का पार्टीवर छापा टाकून पोलिसांनी (Police taken 22 youth with Bollywood Sctress in Hukka party in Igatpuri) बावीस जणांना ताब्यात घेतले आहे. स्काय व्हिला या दोन बंगल्यात ही पार्टी सुरु अ(Party was on in sky villa bunglow at Midnight) सल्याची माहीती मिळाल्यावरुन पोलिसांनी कारवाई केली. ताब्यात घेतलेल्यांची नावे अद्याप प्राप्त झालेली नाही. यामद्ये बिग बॅासमध्ये सहभागी झालेल्या (Actress connection with Big Boss Show also Found) महिलेचाही संबंध असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. 

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले की, ग्रामीण पोलिसांनी याविषयी माहीती मिळाली होती, इगतपुरीत दोन बंगल्यावर ड्रगसह हुक्का पार्टी सुरु असल्याने त्यानुसार  ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत १० पुरुष आणि १२ महिला अशा २२ जणांना अटक केली आहे. पार्टीविषयी तपास सुरु आहे. ग्रामीम पोलिसांनी अटक केलेल्या महिलांमध्ये मराठी आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींचा समावेश आहे. त्यात, बिग बॉसमध्ये स्पर्धक राहिलेल्या अभिनेत्रीसह एका परदेशी महिलेलाही पोलिसांकडून अटक केली आहे. पार्टीत सहभागी झालेले लोक चित्रपट दुनियेशी संबधित आहे.

पावसाळा अन पार्ट्या
पावसाळ्यात इगतपुरीत रिसॉर्टसह खासगी बंगल्यावर मोठ्या प्रमाणावर पार्ट्या होतात. काही वर्षापूर्वी अशाच एका बंगल्यात अभिनेत्रीचा मृतदेह सापडला होता. शनिवार व रविवार राज्यात विकेंड लॉकडाउन असल्याने हॉटेल आणि पर्यटनस्थळ बंद असून खसागी बंगल्यावर लोकांच्या पार्ट्या होतात. बऱ्याचदा रात्रीच्या मोठ्या आवाजातील ध्वनीक्षेपकांमुळे आसपासचे लोक तक्रारी करतात.पण जिथे कुठलेही ध्वनीक्षेपक नसतात तेथील पार्ट्याबाबत मात्र स्थानीकांनाही थांगपत्ताही नसतो.
... 
हेही वाचा...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com