मुंडे, खडसे हसत राहिल्या अन् भारती पवार मंत्री झाल्या !   - Bharti Pawar became minister and those Two were keep laughing, Nashik Politics | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

मुंडे, खडसे हसत राहिल्या अन् भारती पवार मंत्री झाल्या !  

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 जुलै 2021

 भारती पवार यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डाँ. भारती पवार यांची काल केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. त्यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. तर दुसरीकडे खासदार डाँ. प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळाले नाही, यावरुन सोशल मीडियात चर्चा रंगल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भारती पवार यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी उलटसुलट चर्चा करीत आहेत. bharti pawar says thanks to fadnavis and mp pritam munde mp raksha khadse laughs video viral again

हा व्हिडिओ लोकसभेतील असून यात भारती पवार या भाषण करीत आहेत. त्यांच्यामागे बसलेल्या खासदार रक्षा खडसे, डाँ. प्रीतम मुंडे या हसताना दिसतात. भारती पवार या मराठीत भाषण करीत आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याने त्यांचे आभार पवार यांनी व्यक्त केले. त्यांनी केंद्रसरकारने जलशक्ती मंत्रालय स्थापन केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त करीत आहेत.  तर त्यांचे भाषण सुरू असताना मागे बसलेल्या प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंना हसू आवरेना. 

प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंना एवढू हसू आलंय की त्या खासदारांच्या बाकाच्या खाली तोंड लपवत हसत राहिल्या. चर्चेचं गांभीर्य लक्षात घेता त्या पुन्हा गंभीर झाल्या. पण त्यांच्या चेहऱ्यावरचा मिश्किलपणा काही गेलेला नव्हता. या व्हिडीओत प्रीतम मुंडे, रक्षा खडसे या जरी भारती पवार बोलत असतानाच हसल्या असल्या तरीसुद्धा त्या भारती पवारांवरच हसतायत याचा कुठलाही पुरावा नाही. प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांनीही कधी म्हटलेलं नाही की त्या भारती पवारांच्या बोलण्यावर हसलेल्या आहेत. कदाचित त्यांच्यात दुसऱ्याच गोष्टीत एखादा विनोद झाला असेल त्यांना हसू आवरलं नसण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

प्रीतम मुंडे यांना मंत्रीपद मिळाले नाही, तर दुसरीकडे भारती पवार यांना मंत्रीपद मिळाले, कारण कुठलेही असले तरी भारती पवार भाषण करीत असताना प्रीतम मुंडे, रक्षा खडसे हसताना दिसत असल्याने अनेक नेटकऱ्यांनी यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.  यातून काय संदेश घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. 
  

भारती पवारांमुळे नाशिकला पहिल्यांदाच दिल्लीत मानाचे पान!
नाशिक : `हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धाऊ गेला` राजकारणातील ही बहुचर्चीत म्हण संरक्षण मंत्री (कै) यशवंतराव चव्हाणांमुळे  नाशिकशी संबंधीत आहे. मात्र थेट नाशिकला आजवर केंद्रात मंत्रीपद मिळालेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या मंत्रीमंडळ विस्तारात दिंडोरीच्या डॅा भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांना संधी मिळाल्याने ते नाशिकला दिल्लीत पहिले मानाचे पान ठरले..

भारती पवारांचे मंत्रीपद... सांगितले बंगलोरला अन् गेल्या दिल्लीला!
नाशिक : मंत्रीमंडळात स्थान मिळविणे, ते देखील पहिल्याच टर्ममध्ये हे अवघड असते. मात्र घरातील पन्नास वर्षांचा राजकीय वारसा, संस्कार, हुशारी हे गुण डॅा. भारती पवार यांना मंत्रीपदापर्यंत घेऊन गेले आहेत.  यावेळी देखील अत्यंत गोपनीय पद्धतीने फिल्डींग लावत त्यांनी मी बंगलोरला चालले आहे, असे सांगत त्यांनी दिल्ली गाठली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख