शासनाने आदेश देऊनही नागरीक मदतीपासून वंचीत

महाराष्ट्र व केंद्र शासनाने कोरोना कालावधीत निराधार, विधवा व दिव्यांग व्यक्तीच्या खात्यावर एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्याचा अतिरिक्त निधी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र निफाड तालुक्‍यातील लाभार्थी अद्याप त्यापासून वंचित आहेत.
Bharati Pawar Demands Timely help to the Poor From Government
Bharati Pawar Demands Timely help to the Poor From Government

नाशिक : ''महाराष्ट्र व केंद्र शासनाने कोरोना कालावधीत निराधार, विधवा व दिव्यांग व्यक्तीच्या खात्यावर एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्याचा अतिरिक्त निधी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र निफाड तालुक्‍यातील लाभार्थी अद्याप त्यापासून वंचित आहेत, हा प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे. तो तातडीने दूर व्हावा,'' असे खासदार डॉ. भारती पवार यांनी सांगितले. 

नुकतीच प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन अडचणी सांगीतल्या. "रोजंदारीवर सर्वस्व अवलंबून असलेले अनेक गरीब नागरीक कोरोना संचारबंदीमुळे अद्यापही घरातच अडकून पडले आहेत. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचलेली नाही. प्रशासनाने त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे. कोणीही वंचीत राहू नये याची दक्षता घ्यावी,'' असे त्यांनी सांगीतले. 

...कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरु झाले. संचारबंदी करण्यात आली. त्यामुळे अनेक नागरीक घरात अडकून पडले. देशभारत कोरोनाच्या संसर्गाने धुमाकुळ घातला आहे. यामध्ये संपुर्ण देश लॉकडाऊन असल्याने असंख्य गरीब कुटुंबं घरातच अडकून पडली आहेत. त्यांचा प्रपंच हातावरचा असल्याने त्यांच्यापर्यंत कोणतीच शासकीय, सेवाभावी संस्थांची पुरेशी मदत पोहोचलेली दिसत नाही. खुप कमी प्रमाणात या घटकांना मदत मिळाली आहे. निफाड तालुक्‍यातील विधवा, निराधार, दिव्यांगांची संजय गांधी श्रावण बाळ व अन्य योजनांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर अद्यापही जमा झालेला नाही.....अशी तक्रार प्रहार संघटनेने केली आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यानंतर त्यांनी खासदार डॉ. भारती पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी खासदार पवार यांनी तातडीने संबंधीतांना सूचना देऊन हे प्रश्‍न सोडवावे असे सांगीतले. या प्रश्‍नात आपण व्यक्तीशः लक्ष घालू असे सांगीतले. 

व्यापाऱ्यांच्या अडचणी घेतल्या समजून

यावेळी खासदार पवार यांनी पिंपळगाव बसवंत (निफाड) येथे भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने परिसरातील व्यापाऱ्यांच्या समस्या व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे समजून घेतल्या. व्यापाऱ्यांच्या प्रश्‍नांना समाधानकारक उत्तरे देऊन, या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्‍वासन दिले. व्यापाऱ्यांनी नियमाचे पालन करून आपला व्यवसाय सुरू करावा, असे सांगितले.

दगुनाना मोरे नगर येथील साईबाबा मंदिरात झालेल्या या कार्यक्रमात मोबाईल असोसिएशनचे समीर सोनी, शीतल धाडीवाल, संदेश सोळंकी, मयूर आहेर, बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे दत्ता निफाडे, प्रितेश छाजेड, अनिल पुरकर, होलगडे, किराणा कटलरी असोसिएशनचे भरत छाजेड, कमल किशोर राठी, शामलाल बोरा उपस्थित होते. 
... 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com