अमृता पवारांनी आणली १.६४ कोटींची पाणी योजना

जिल्हा परिषदेच्या सदस्या आर्की. अमृता पवार आपल्या गटातील देवगाव (निफाड), महादेवनगरसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत १.६४ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात यशस्वी झाल्या आहेत.
Amruta Pawar
Amruta Pawar

नाशिक : जिल्हा परिषदेच्या सदस्या आर्की. अमृता पवार आपल्या गटातील देवगाव (निफाड), महादेवनगरसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत १.६४ कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात यशस्वी झाल्या आहेत.

या पाणीपुरवठा योजनेसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. निधीच्या उपलब्धतेसह विविध अडचणींवर त्यांनी यशस्वीपणे मात केली. 

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत देवगाव / महादेवनगर येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे भुमिपूजन नुकतेच जिल्हा परिषद सदस्या आर्की पवार यांच्या हस्ते झाला. या योजनेसाठी एक कोटी ६४ लाख एव्हढा निधी मंजूर झालेला आहे. येत्या अठरा महिन्यांच्या कालावधीत ही योजना पुर्ण केली जाणार आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय होईल. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती व अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः उन्हाळ्यात लया भागात पाण्याची अडचण होत होती. ती समस्या दुर झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.  

यावेळी निफाड पाणीपुरवठा विभागाचे उपविभागीय अभियंता संजय मिस्त्री,   शाखा अभियंता अरुण पाटील, देवगावच्या सरपंच सौ. वैशालीताई अढांगळे, उपसरपंच लहानू मेमाणे, रामनाथ शिंदे,  किशोर बोचरे, दादासाहेब माळी, विनोद जोशी, सौ. इंदुबाई पिंगळे, सौ. मधुरा बोचरे, सौ. कोमल गव्हाणे, श्री. योगेश कुलथे, सौ. कमल बोचरे, सौ. ज्योती अढांगळे, सौ. अर्चना लोहारकर, ग्रामसेविका के.बी.पगारे यांसह विविध नागरिक उपस्थित होते. 
....
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com