'तो' फलक काढण्यासाठी तृप्ती देसाई शिर्डीकडे रवाना - Bhoomata Brigade Leader Trupti Desai To Reach Shirdi Today for Agitation | Politics Marathi News - Sarkarnama

'तो' फलक काढण्यासाठी तृप्ती देसाई शिर्डीकडे रवाना

सागर आव्हाड
गुरुवार, 10 डिसेंबर 2020

शिर्डी संस्थानने महिलांच्या कपड्यांबाबत लावलेला बोर्ड काढून घ्यावा नाहीतर आम्ही जाऊन काढू, अशी भूमिका तृप्ती देसाई यांनी घेतली असून तृप्ती देसाई शिर्डी कडे निघाल्या आहेत.

पुणे : शिर्डी संस्थानने महिलांच्या कपड्यांबाबत लावलेला फलक काढून घ्यावा नाहीतर आम्ही जाऊन काढू, अशी भूमिका तृप्ती देसाई यांनी घेतली असून तृप्ती देसाई शिर्डी कडे निघाल्या आहेत.

आमचा आवाज दाबला जात आहे .पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न करू नये, अशी आम्ही कायदेशीर मागणी करत आहोत.  आज मानवी हक्क दिन आहे. आम्हाला पूर्ण अधिकार आहे. आम्ही शिर्डीमध्ये जाऊन दर्शन घेणार आहोत, असे तृप्ती देसाई यांनी शिर्डीला निघण्यापूर्वी सांगितले

साई बाबांच्या दर्शनाला तोकडे कपडे घालून येऊ नये अशी साईभक्तांना साई संस्थान कडून विनंती करण्यात आली आहे तसे फलकही ही मंदिर परिसरामध्ये लावण्यात आले आहे. या निर्णयाचे अनेक भाविकांनी समर्थन केले असले तरी या निर्णया विरोधात तृप्तीताई देसाई यांनी मंदिर परिसरात लावलेले फलक आज शिर्डीत येऊन काढणार असल्याचा इशारा दिला असल्याने शिर्डी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिर परिसराची पाहणी एडिशनल एसपी दिपाली काळे यांनी केली आहे.

शिर्डी येथील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी सूचना साईबाबा संस्थानने भाविकांना केली आहे. यावरून वाद निर्माण झाला आहे. भूमाता ब्रिगेडच्या देसाई यांनी संस्थानने फलक न काढल्यास आम्ही शिर्डीत येऊन तो फलक काढू, असा इशारा दिला होता. परंतु हा फलक काढण्यात आलेला नाही. त्यामुळे देसाई यांनी तो काढण्यासाठी शिर्डीला जाणार असल्याचे पत्र संस्थानला पाठविले होते. 

या वादामुळे स्थानिक प्रशासनाने शिर्डी प्रवेशावर बंदी घालत आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, आज सकाळी भूमाता ब्रिगेडच्या महिलांना घेऊन तृप्ती देसाई शिर्डीच्या दिशेने रवाना  झाल्या आहेत. नगर मार्गे त्या शिर्डीत पोहोचणार आहेत. बोर्ड हटवणारचं या इराद्याने आम्ही शिर्डीत धडकणार असून कोरोनाचे सगळे नियम पाळून आंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Edied By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख