The mother of the martyr will get four acres of land | Sarkarnama

शहिदाच्या मातेस मिळणार चार एकर जमीन 

संपत मोरे 
सोमवार, 18 मे 2020

शहीद जवान कविचंद भालेराव यांच्या वीरमाता रुक्‍मिणीबाई भालेराव यांना उदरनिर्वाहासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वावलंबन योजनेतून चार एकर जमीन देण्यात यावी, अशी मागणी खासदार राजीव सातव यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे केली होती.

पुणे ः "शहीद जवान कविचंद भालेराव यांच्या वीरमाता रुक्‍मिणीबाई भालेराव यांना उदरनिर्वाहासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वावलंबन योजनेतून चार एकर जमीन देण्यात यावी' अशी मागणी खासदार राजीव सातव यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्याकडे केली होती. त्या मागणीला प्रतिसाद देत डॉ. कदम यांनी हिंगोलीच्या जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

हिंगोली जिल्ह्यातील पिंपळदरी येथील कविचंद भालेराव हे बीएसएफमध्ये ड्यूटी करत होते. कर्तव्य बजावत असताना 6 जुलै 2002 रोजी ते शहीद झाले. त्यांच्या पश्‍चात त्यांच्या आई हालाखीचे जीवन जगत आहेत. याबाबत खासदार राजीव सातव यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ विश्वजित कदम यांना पत्र पाठवून "शहीद जवान कविचंद भालेराव यांच्या वीरमाता रुक्‍मिणीबाई भालेराव यांना उदरनिर्वाहासाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वावलंबन योजनेतून चार एकर जमीन देण्यात यावी' अशी मागणी केली होती. 

डॉ. विश्वजित कदम यांनी हिंगोलीचे जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. 14 ऑगस्ट 2018 च्या सरकारी निर्णयाप्रमाणे कार्यवाही करून श्रीमती भालेराव यांना जमीन देण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख